July 21, 2026

आखाती देशांमध्ये युद्ध भडकले ; इराणच्या पाणबुडीवर अमेरिकेचा ड्रोन हल्ला.                               

0

   जहाज देखभाल केंद्रावर हल्ला“काल, ड्रोनचा वापर करून, अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी इराणमधील पाणबुडी आणि जहाज…


IMG_20260713_222722

लोकहित न्यूज:  विलास कवठणकर                

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्ध भडकले असून, अमेरिकी सैन्याने इराणच्या पाणबुडी आणि जहाज देखभाल केंद्रावर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आजच याबाबत, माहिती दिली आहे. ड्रोनच्या माध्यमातून अमेरिकडून या केंद्रावर अचूक हल्ला करण्यात आला, असे सेंट्रल कमांडने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाणबुडी आणि जहाज देखभाल केंद्रावर हल्ला
“काल, ड्रोनचा वापर करून, अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी इराणमधील पाणबुडी आणि जहाज देखभाल केंद्रावर हल्ला केला,” असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चिघळला असताना हा हल्ला झाला आहे.

जहाज देखभाल केंद्रावर हल्ला
“काल, ड्रोनचा वापर करून, अमेरिकेच्या सुरक्षा दलांनी इराणमधील पाणबुडी आणि जहाज देखभाल केंद्रावर हल्ला केला,” असे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष चिघळला असताना हा हल्ला झाला आहे. अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केले. प्रत्युत्तरदाखल इराणने देखील मध्य पूर्वेतील कतार, बहारीन, जॉर्डन आणि ओमान येथील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले.

व्हिडीओ प्रसिद्ध
अमेरिकेच्या मानवरहित सागरी जहाजांनी बंदर अब्बास बंदरावर हा हल्ला केला. अमेरिकेकडून पहिल्यांदाच सागरी ड्रोनचा वापर करण्यात आला. अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्कराने सोमवारी हवाई संरक्षण प्रणाली, रडार, क्षेपणास्त्र आणि ड्रोन, बोटींसह विविध ठिकाणांवर हल्ले केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अमेरिकेने इराणच्या विविध ठिकाणी हल्ले चढविले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *