ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं
लंडन – ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा टी-२० विश्वचषकातील दबदबा कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा लॉर्ड्सच्या मैदानावर ७ विकेट्सने पराभव करत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.ऑस्ट्रेलियाने विक्रमी सातव्यांदा महिला टी-२० विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाने सांघिक कामगिरीच्या बळावर हा ऐतिहासिक विजय नोंदवला
