पश्चिम भागातील उगवता तारा; काँग्रेस युवा नेता दीपक गोपाळ कवठणकर !


तालुका जिल्हा ते राज्यस्तरीय पक्ष प्रभाव; तालुक्यातील मुख्य काँग्रेस पदाधिकारूनापैकी एक विश्वासू नेतृत्व म्हणून ओळख!

    

वाढदिवस विशेष

विलास कवठणकर/  लोकहित न्यूज ( विशेष)

     देवाचीहट्टी ( ता. खानापूर) या छोट्याशा गावातून तालुका जिल्हा ते राज्यस्तरीय पक्ष मजल मारणे आजकाल तितके सोपे नाही . ते करून दाखवले आहे एक व्यावसायिक ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रभावी राजकारणी कसा असतो. माजी आमदार तथा केपीसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर यांचे विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी म्हणून त्यांनी पक्षात आपली मोहोर उमटवली आहे. अशी ओळख श्री दीपक गोपाळ कवठणकर यांची निर्माण झाली आहे. पालकमंत्री सतीश जार्कीहोळी ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापर्यंत आपली छबी तयार केली आहे. विशेष म्हणजे जांबोटी पश्चिम भागात एकमेव निष्ठावंत काँग्रेस नेता व कार्यकर्ता म्हणून भागातील जनता त्यांना ओळखते. त्यांनी आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षासाठी उत्तम भूमिका बजावली आहे, म्हणूनच त्यांची तालुका काँग्रेसमध्ये हुकूमत चालते असे म्हटले तरी वावगे ठरु नये, अशीच मानसिकता सर्वत्र दिसते आहे. आज दीपक कवठणकर यांचा वाढदिवस असून, त्यांच्यावर जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे, लोकहित न्यूज तर्फे दीपक कवठणकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *