कृष्ण भक्तीने जीवनाचे सार्थक: प्रमोद कोचेरी..


खानापुरात (इस्कॉन हरे कृष्णा)जगन्नाथ रथ उत्सव सोहळा सपन्न!

   

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      कृष्ण म्हणजे जगन्नाथ, कृष्ण म्हणजेच पांडुरंग , कृष्ण म्हणजेच ब्रम्हांड आहे, कृष्णाच्या भक्तीतच जीवनाचे सार्थक आहे. त्यामुळे सर्वांनी कृष्ण भक्तीत लीन व्हावे, त्यासाठी इस्कॉन च्या हरे कृष्णा कृष्णभावनामृत संघ हा एकमेव मार्ग असून, त्याचा सर्वांनी अवलंब करावा असे आवाहन राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी यांनी केले. नुकतेच खानापुरात इस्कॉन ( हरे कृष्ण) कृष्ण भावनामृत संघातर्फे जगन्नाथ रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय कुबल, तालुका भाजप प्रधान सचिव मलाप्पा मारिहाळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

        यावेळी प्रमोद कोचेरी, आ. विठ्ठल हलगेकर, संजय कुबल, तालुका भाजप प्रधान सचिव मलाप्पा मारिहाळ आदी मान्यवरांना रथ ओढून भगवंताच्या भक्तीत लीन होण्याचे भाग्य मिळाले. खानापूर शहरातून वाजत गाजत जगन्नाथ रथोत्सवाची मिरवणूक काढण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *