माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या गर्लगुंजी गावकऱ्यांचे बस व्यवस्थापकांना निवेदन!
गर्लगुंजी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्यातील महत्वाच्या गावांपैकी एक गाव म्हणून गर्लगुंजी गावची ओळख आहे. हे लोकसंख्येमध्येही मोठेच आहे. त्यामुळे बेळगांव आणि खानापूर ही दोन्हीं शहरे जवळ येतात. त्यामुळे दोन्हीं बाजूने बससेवा आहे, पण, अलिकडच्या काळात दोन्हींकडील बससेवा सुरळीत होत नाही. त्यामुळे शाळकरी मुलांसह मजूर, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याची दखल गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बेळगांव आणि खानापूर बसव्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गर्लगुंजी गावाला बेळगांव आणि खानापूरहून बससेवा सुरू असली तरी अलीकडच्या काळात दोन्हींकडील बससेवा कोलमडली असून, शाळकरी मुलांसहा मजूर नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगांव आणि खानापूर स्थानकातील व्यवस्थापकांनी याची दखल घेऊन दोन्हीकडील बससेवा वेळेवर सोडावी, तसेच गर्लगुंजी गावच्या श्री माऊली देवी यात्रा होणार असून, याकाळात जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. त्या निवेदनाची प्रत डीटीओनाही पाठवण्यात आली असून, त्यांनीही या मागणीला हिरवा कंदील दर्शविला. यावेळी रामचंद्र लोहार, परशराम बेळगांवकर, सतीश बुरुड, विजय लोहार आदी उपस्थित होते..






Leave a Reply