यंदा खानापूरचा निकाल 95 % पार ; बहुतेक विद्यार्थी पार पडले..
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मुळात शिक्षक म्हणून तालुक्यात ओळख असलेल्या आमदार विठ्ठल हलगेकर यांना आजही ‘सर’ म्हणून बोलावले जाते. आमदार हलगेकर यांचा संपूर्ण कल अर्थात शिक्षणावर भर असतो, ते शाळांचा दर्जा सुधारावा म्हणून नेहमीच आग्रही असतात. त्यामुळेच त्यांनी तालुक्यातील कित्येक शाळांच्या सुधारणेसाठी निधी मंजूर केला असून, विशेषकरून आमदार विठ्ठल हलगेकर यांनी शिक्षण विकासाठीच अनेकवेळा अधिवेशन, सबंधित मंत्र्यांकडे आवाज उठवला आहे, शिवाय या विषयाबाबत ते प्रयत्नशील आहेत. खानापूर तालुक्यातील विशेष श्रेणीसह उत्तमपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमदार सरांनी कौतुकाची थाप दिली आहे , शिवाय पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभिमान अधिकच उंचावला आहे… लोकहित न्यूज तर्फे तालुक्यातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन!






Leave a Reply