नारी शक्ती विधेयक विरोधकांनी फेटाळल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपच्यावतीने वरळी मुंबईत भर रस्त्यावरून निघाला होता मोर्चा; त्या दरम्यान तब्बल सव्वा तास थांबून राहिलेल्या त्या महिलेचा राग झाला अनावर!
मुंबई: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
गेला आठवडा राजकीय आरोप प्रत्यारोपांनीच गाजला. विषय होता नारी शक्ती विधेयक! अगदी जोरदारपणे सत्ताधारी भाजपने सदर विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला पण, तो असफल ठरला! या विधेयकाच्या समर्थनात तीनशेचा आकडा मोदी सरकारला पार करता आला नाही. यावेळी विरोधकांनी यात बाजी मारल्याचे दिसून आले. त्याचाच निषेध नोंदवण्यासाठी देशभर भाजपकडून मोर्चा, आंदोलने काढण्यात येत आहेत, असाच एक मोर्चा मुंबईतील वरळी भागातून भाजपच्यावतीने भर रस्त्यावरून निघाला होता, त्यात तब्बल सव्वा तास अडकून संतप्त झालेल्या सुशिक्षित महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनाच समोर जावून जाब विचारत ‘गेट आउट म्हटलं’! अर्थात येथून चालते व्हा! असा व्हिडिओ महाराष्ट्रभर वायरल झाला आहे, त्याचे महिलांसह सर्व वर्गातून समर्थन होत आहे. तर हा मोर्चा महिलांसाठीच होता आणि अशावेळी महिलेने असे बोलणे चुकीचे असल्याचे सांगत भाजपकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जात आहे..

नेमकी काय आहे ही घटना ते समजून घेऊ….
विरोधकांनी नारी शक्ती महिला विधेयक नामंजूर केल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपकडून देशभर आंदोलने सुरू आहेत. असाच एक मोर्चा मुंबईतील वरळी भागातून भर रस्त्यावरूनच निघाला होता, आधीच मुंबईत ट्रॅफिकचा बोजवारा असतांना त्यात या मोर्चामुळे रस्ता जाम झाला होता. त्यात तब्बल सव्वा तास दोन्हीं बाजूची वाहने थांबूनच होती, यामध्येच अडकून पडलेल्या मुंबईतच राहणारी एक उच्च शिक्षित महिलेने पुढे येत पहिल्यांदा तेथे बाजूला असणाऱ्या पोलिसांना विनंती केली की, तुम्हीं हा रस्ता का अडवलात, आम्हीं तासंतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडलोय, याचं काहीं सोयसुतक नाही का? तुम्हांला असा प्रश्न विचारला! त्यावर पोलिसांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अधिकच भडकलेल्या सदर महिलेने थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ जाऊन पुन्हा तसाच प्रश्न उपस्थित केला, त्यावर त्यांनीही काय झालं, काय झालं अस त्या महिलेला विचारलं! त्यावर एवढी मोठी ट्रॅफिक जाम झाली आहे, ती तुम्हांला दिसत नाही का? कशासाठी तुम्हीं रस्ता उडवून सामान्य जनतेला त्रास देताय असा सवाल महिलेने पुन्हा मंत्र्यांना केला, त्यावर मात्र, मंत्री महाजन यांच्याकडे कोणतेच उत्तर नव्हते, त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या त्या महिलेने थेट मंत्र्यानाच गेट आउट म्हटलं अन् तो व्हिडिओ महाराष्ट्रभर वायरल झाला आहे.
सामान्य नागरिक म्हणतात योग्यच ‘त्या’ महिलेच!
त्या घटनेबद्दल सामान्य स्थानिक नागरिकांना वृत्तवाहिन्यांनी विचारले असता, महिलांसह सर्व वर्गातून समर्थन देण्यात आले, अर्थात त्या महिलेच योग्या आहे, अशा प्रतिक्रिया सर्वत्र पहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे आम्हीं संयमाची भूमिका घेत सदर महिलेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या ऐकल्या नाहीत. आम्हीं त्यांना सांगितले की, पंधरा मिनिटात हा मोर्चा दुसरीकडे वळवून रस्ते मोकळा करून देऊ असे सांगितले असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी वृतवाहिन्यांशी बोलतांना दिली.






Leave a Reply