,

जांबोटी माध्यमिक विद्यालय 💯% पार!


उज्वल निकालाची परंपरा कायम;  पैकीच्या पैकी सर्वच विद्यार्थी पास, सर्व शिक्षकांचे अती मोलाचे सहकार्य!

विलास कवठणकर: लोकहित न्यूज (विशेष प्रतिनिधी)

        तालुक्यातच एक कडक शिस्त ,उत्तम शिक्षण, क्रीडासह सर्वच बाबतीत नेहमीच पुढे असणाऱ्या विश्वभारत सेवा समिती संचलित जांबोटी माध्यमिक विद्यालयाने उज्वल निकालाची परंपरा कायम राखत, 💯 % निकाल खेचून आणला आहे. यंदा या विद्यालयातून 70 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यांपैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण (पास) झाले आहेत. विशेष श्रेणीत 8 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 51 द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थ्यांनी आपले नाव कोरले आहे. आणखी कौतुकाची गोष्ट म्हणजे ए +प्लस मानांकन मिळाले आहे. याबद्दल तालुका आणि जांबोटी भागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.. लोकहित न्यूज तर्फे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा!

    मुलींचीच बाजी; सर्व शिक्षकांचे अती मोलाचे सहकार्य!

        यंदा जांबोटी माध्यमिक विद्यालयात मुलींनीच बाजी मारली असून, यासाठी मुख्याध्यापक महेश सडेकर यांच्यासह सर्वच शिक्षकांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. कुमारी सानिका सुरेश सुतार 596 गुण (95.36 टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, कुमार गणेश सुभाष गुरव 588 गुण (94.08 टक्के) मिळवत दुसरा क्रमांक, कुमारी अनुष्का उमेश हळदणकर हिने 574 गुण (91.84 टक्के) , कुमार श्रद्धा जोतिबा नावगेकर हिने 554 गुण ( 88.64 टक्के) तर स्नेहन संजय कनगुटकर हिने 547 गुण ( 87.52 टक्के) मिळविले आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विद्यार्थी अ+प्लस तर 8 विद्यार्थी अ श्रेणीत पास झाले आहेत..

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *