
2025-26 सालात उल्लेखनीय कामगिरी करत स्कूलची गुणवत्ता केली सिद्ध; स्कूल प्रशासनाची समर्थ साथ!
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
शाझिया अहमदपाशा हिच्या उत्तम यशामुळे समर्थ स्कूलचा गौरव वाढला असल्याचे मत खानापूर येथील समर्थ इंग्लिश माध्यम स्कूलच्या प्रशासनाने मांडले आहे. यंदा समर्थ स्कूलचा निकाल चांगला लागला असून, विद्यार्थ्यांनी उत्तम यशाला गवसणी घातली असल्याची प्रतिक्रिया स्कूलचे मुख्यस्थ तथा खानापूर डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. नाडगौडा यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.
स्कूल प्रशासनाची उत्तम साथ अन् विद्यार्थांनी ठरवली सार्थ!
समर्थ स्कूल प्रशासनाची उत्तम शिस्त, शिक्षणाच्या वेगळ्या पद्धतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे, गाझिया अहमदशा इनामदार हिने 592 गुण (94.72 टक्के) मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर गौतमी गुरुबसप्पा सत्तिगिरी हिने 489 गुण ( 78.24 टक्के) , स्मिता राजू मादार हिने 483 गुण ( 77.28 टक्के) , कुमार सागर शिवाजी गुरव याने 479गुण ( 76.64 टक्के) , तर स्नेहल पराशराम पाटील हिने 454 गुण (72.64 टक्के) मिळविले आहेत. शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, प्रशासकीय विभाग आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी अतिसुंदर कामगिरी केली असून, यापुढेही स्कूल प्रशासनाची अशीच समर्थ साथ राहील, यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत…






Leave a Reply