
दि ग्रेट भेट; सध्याच्या काळातील दुर्मीळ चित्र, निमित्त होते म. जोतिबा फुले जयंतीचे !
नवीदिल्ली: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
एरवी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची ग्रेट भेट झाल्याचे सध्याचे चित्र चर्चेत आले आहे. निमित्त होते महिला आणि समाजाला योग्य ती दिशा देणारे समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे! यावेळी फुलेंना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्ण जे. पी. नड्डा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सध्या पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच रंगात आल्याचे चित्र असून, दिल्लीतील सर्वच नेते तिकडे ठाण मांडून आहेत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द ‘….
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात बराच वेळ सौहार्द चर्चा रंगली होती, महात्मा फुलेंचे कार्य, देशसुधारणेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पण, या सौहार्द चर्चेचं चित्र तसं दुर्मीळच म्हणावं लागेल. एरवी एकमेकांवर तुटून पडणारे देशाचे सर्वोच्च नेते तेही समाजाला आणि आपापल्या कार्यकर्त्यांना कट्टर विरोधीपणा दाखवतात आणि आपण मात्र, एकच असतात हे या चित्रावरून स्पष्ट होते. पण, हिकडे त्यांचे खालचे कार्यकर्ते व नेते भांडून भांडून आपापसातील जवळचा सौहार्द सबंध बिघडून घेतात.. या चित्रावरून तरी सर्वांनी बोध घेण्याची गरज आहे….






Leave a Reply