July 21, 2026

खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!

0
Screenshot_20260411_072015.jpg

332 पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण; कु. कांचन धुरी प्रथम, कु. सुमिया धामणेकर द्वितीय तर कु. मधुराणी मालशेट हिने तृतीय क्रमांक पटकावला!

   

     

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) शिक्षण !

    खानापूर मराठा मंडळ पीयू कॉलेजचा यंदा 78 टक्के निकाल लागला असून, 332 पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कु. कांचन धुरी 566 गुण (94.33) प्रथम , कु. सुमिया धामणेकर 554 गुण (93.03 टक्के), कु. मधुराणी मालशेट 553 गुण ( 92.01टक्के ) , कु. श्रावणी गोरल 552 गुण (92 टक्के) मिळविले आहेत. उत्तीर्ण झालेल्या 255 विद्यार्थ्यांमध्ये 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 158 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 59 विद्यार्थी तृतीय श्रेणीत तर 13 विद्यार्थी पास झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभले असून, प्राचार्य वाय. एच. अनगोळकर व सर्व प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

वाणिज्य विभाग-

  कु. साक्षी पाटील 552 गुण ( 92 टक्के) प्रथम, कु. भक्ती बैलूरकर 550 गुण (91.66 टक्के) द्वितीय, कु. अनुराधा पाटील 542 गुण (90.33 टक्के) तृतीय क्रमांक.

कला विभाग-

     कु. आशा अरेर 550 गुण ( 91.66 टक्के) प्रथम, कु. ऐश्वर्या कुगी 535 गुण ( 89.16 टक्के)  तर ऋतुजा चापगावकर 524 गुण (87.33 टक्के) घेऊन तिसरा क्रमांक पटकावला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *