लोकहित न्यूजचा इफेक्ट – ‘जांबोटी राजवाडा रस्त्याचे’ काम उद्यापासून सुरू होणार!


जांबोटीच्या युवकांनी उठवला होता आवाज; त्याची दखल ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण जांबोटकर आणि आमदारांनी घेतली अन् कॉन्ट्रॅक्टर खडबडून जागे झाला…..

    

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        जागृती आणि उठवल्यानंतर व्यवस्था कशी जागे होते याचे ताजे उदाहरण देता येईल, ते म्हणजे जांबोटीराजवाडा रस्त्याचे! काल जांबोटीच्या युवकांनी या काम बंद रस्त्याबद्दल जागृती केली . त्या समस्येबद्दल  लोकहित न्यूजने आवाज उठवला अन् जांबोटीचे ग्रा. पंचायत सदस्य बाळकृष्ण जांबोटकर दखल घेऊन कॉन्ट्रॅक्टर सोमकुमार पाटील यांना चांगलाच जाब विचारला शिवाय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या कानावर ही बातमी घातली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या कॉन्ट्रॅक्ट्रराने उद्यापासूनच रस्त्याचे काम सुरू करण्याची हमी दिली आहे. शिवाय लोकहित न्यूजचे संपादक विलास कवठणकर यांनी कॉन्ट्रॅक्टर सोमकुमार पाटील यांच्याशी तत्काळ संपर्क साधून त्वरित रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा याची चौकशी करण्यात येईल असा इशारा देताच ( उद्या ) मंगळवार 31 मार्चला सकाळी कामाला सुरुवात होईल, आज जेसीबी खानापूर रोडवरील पेट्रोल पंपावर थांबवली असून, उद्यापासून कोणत्याही परिस्थितीत काम सुरू होईल अशी हमी दिली.

काम पूर्णच करणार; उद्या सकाळी रस्त्याची पूजा !

      एकदा काम सुरू केल्यानंतर ते पूर्णच करणार असे असे कॉन्टॅक्टरांनी आहे लोकहित न्यूज शी बोलतांना  बोलताना सांगितले. पुन्हा उद्या रस्त्याची पूजा करण्यात येणार आहे. यावेळी लोकहित न्यूजच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याची विनंती कॉन्ट्रॅक्टर सोमकुमार पाटील यांनी केली आहे. तरी नागरिकांनीही उपस्थित राहून कामाची पाहणी करण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया –

तीन वर्षांपासून मी या रस्त्याचा पाठपुरावा करतोय: ग्रा. पंचायत बाळकृष्ण जांबोटकर!

     गेल्या तीन वर्षांपासून मी या रस्त्याचा पाठपुरावा करीत आहे, अखेर यंदा आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे काम सुरू झाले, सदर कॉन्ट्रॅक्टराचे इतर ठिकाणी काम सुरू असल्याने त्याने येथून साहित्य हलवून त्या कामावर नेले होते. त्याला तीन कालावधी झाला. आणि त्यामुळेच आमच्या गावातील युवकांनी केलेली जागृती महत्वाची आहे. त्यामुळेच ही समस्या मार्गी लागेल. काल लोकहित न्यूजमध्ये बातमी प्रसिद्ध होताच मी तातडीने कॉन्ट्रॅक्ट्ररांशी संपर्क साधून, तत्काळ रस्ता सुरू करा, नाही आम्हीं काय गप्प बसणार नाही अशी तंबी देताच त्यांनी उद्याच हे काम सुरू करण्याची हमी दिली आहे. सर्वांनी देखरेख करून चांगले काम करून घ्यावे असे मी सर्वांना आवाहन करतो.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *