आमदारांच्या बातम्या – विकास कामे, समस्या पाहणी, पत्रकार परिषद धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग!


उद्याही तीन ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी दौरा; तालुक्यातील सर्व समस्यांचा घेणार आढावा!

    

खानापूर/ जांबोटी लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गेल्या आठवड्यात जाणून घेतले तालुक्यातील समस्या, धार्मिक कार्यक्रम, आज घेतलेल्या पत्रकार परिषद आणि उद्या तीन ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी होणाऱ्या दौऱ्याबद्दल माहिती….

      

    

सावरगाळीत नुकसानीचा पाहणी दौरा

      पावसामुळे घरावर विजसेवा पडल्याने घराचे नुकसान झाले होते, येथील परसराम सोनप्पा घाडी यांच्या घरावर विजसेवा पडून मोठे नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने गावचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन, नुकसानग्रस्त गावकऱ्याला धीर दिला, तसेच तत्काळ वीजसेवा सुरू करण्याचे निर्देश हेकॉमला दिले.

तालुक्यातील विविध गावातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी!

        मार्च  हा एकादशींचा महिना असल्याने तालुक्यातील सर्वच गावात पांडुरंग सप्ताह सोहळा होतोच.  त्यामुळे येथील धार्मिक कार्यक्रमात आमदारांना आमंत्रण नाही असे होणे शक्यच नाही! त्यामुळे आमंत्रित सर्व गावातील धार्मिक कार्यक्रमात आमदारांनी हजेरी लावली. नागुर्डा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या नियोजित सभा मंडप जीर्णोद्धार सोहळ्यात आमदार सहभागी झाले होते. यावेळी ‘जागर लोकसंस्कृतीचा‘ या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले, म. ए. समिती नेते बाबासाहेब दळवी यांच्यासह आमंत्रित सर्व मान्यवर उपस्थित होते.

अस्तोलीतील हनुमान मंदिराचे उद्धघाटन; गोव्याचे सांस्कृतिक मंत्री उपस्थित….

      गेल्या दहा वर्षांपासून रखडलेले येथील हनुमान मंदिराचे उद्धघाटन आमदार विठ्ठल हलगेकर, गोव्याचे सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर व पंचकृषीतील आजी माजी मान्यवर उपस्थित होते.


       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *