उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघातात मृत्यू; महाराष्ट्रात शोककळा; बारामती येथे विमान उतरताना क्रॅश झाल्याने ही घटना घडल्याचे वृत्त आहे…
बारामती: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांच्याबरोबर आणखी पाच जणांचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बारामती येथे कार्यक्रमानिमित येत असताना विमान उतरताना क्रॅश झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेने महाराष्ट्र आणि देशभर एकच शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील एक मोठ व्यक्तिमत्व अशी अजित पवार यांची ओळख आहे.
राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली….
संजय राऊत म्हणतात, अजित पवार हे राजकारणातील वेगळे व्यक्तिमत्व होते, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली… त्यांनी आपल्या पद्धतीने राजकारण केले. ते आमचे जवळचे स्नेही होते. सर्वच राजकारण्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे…
अपघाताची विशेष चौकशी होणार; उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा इतकी कमकुवत कशी?…
बारामती येथे विमान उतरताना विमान क्रॅश झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असले तरी हा अपघात कसा घडला याची विशेष पथकाद्वारे चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे…






Leave a Reply