July 21, 2026

एमडी सदानंद पाटील म्हणतात, लांडग्यांसारखे वागणारे पाण्यात बुडतात…

0
IMG_20260127_195439.jpg

हब्बहट्टीत एका धार्मिक कार्यक्रमाधील सदानंद पाटील यांचे भाषण चांगलेच चर्चेत; हा सूचक इशारा पाटील यांना कोणाला दिला असावा असाच प्रश्न उपस्थित होतो आहे

हब्बनहट्टी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

            तालुका आणि जांबोटी भागात स्वपक्ष आणि इतर पक्षातही ‘पलटूरामांनी’ चांगलाच उच्छाद मांडला आहे, तोच धागा पकडून की, लैला शुगर्सचे एमडी आणि तालुका भाजप नेते सदानंद पाटील यांनी हब्बनहट्टी (ता. खानापूर) येथील एका धार्मिक कार्यक्रमाच्या स्टेजवर केलेले वक्तव्य तालुकाभर चांगलेच वायरल होत आहे. एमडी पाटील यांनी लांडगा आणि उंटाची गोष्ट सांगताना,  देवाचीहट्टी आणि हब्बनहट्टी मधील मलप्रभा नदीमधून देवाचीहट्टीकडे लांडग्याचे उंटाच्या पाठीवरून बसून जाऊन ऊस चोरून खाल्ला अन् चोरीचा आळ मात्र, उंटावर आल्याने त्याला शेतकऱ्यांकडून मार खावे लागले. पण, दुसऱ्या दिवशी मात्र, बदल्यात उंट लांडग्याला पुन्हा त्या ठिकाणी नेऊन जातो. परत येतांना मात्र , लांडग्याला मलप्रभेत बुडवतो, अशी ही गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. असेच काहीं नेते आणि कार्यकर्ते वागत आहेत , अर्थात आपल्याच पक्षात राहून दगाफटका देण्याच्या तयारीत असल्यासारखे वागत आहेत, असा संशय कदाचीत एमडी सदानंद पाटील यांना येत असावा, आणि म्हणूनच त्यांनी लांडगा आणि उंटाच्या गोष्टीचे उदाहरण दिले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते..

विकासासाठी आम्हीं चोवीस तास उपलब्ध आहोत; एमडी पाटील

         तालुक्यातील विकासासाठी आम्हीं चोवीस तास उपलब्ध आहोत,असे सांगतानाच केलेल्या विकासकामांचा आढावा पाटील यांनी मांडला. तालुक्यात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वच बाबतीत विकास प्रगतीपथावर असल्याचेही ते म्हणाले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *