बेळगुंदी येथील मुलींच्या माध्यमिक विद्यालयातील घटना; पोलीस गुन्हा नोंद करण्यास दबाव? गावपातळीवर न्याय्य मिटवण्याचा प्रयत्न..
बेळगुंदी: लोकहित न्यूज..
बेळगुंदी ( ता. बेळगांव) येथील माध्यमिक मुलींच्या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी शाळेच्या विद्यार्थांनी आणि गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली आहे. आज दुपारी कल्लापा बेळगावकर( रा. बीजगर्णी) या शिक्षकाने आपल्याच शाळेतील विद्यार्थिनीची छेड काढली, त्या मुलीने आपल्या मैत्रिणींना सांगताच सदर शिक्षकाची पहिल्यांदा मुलींनी तर नंतर गावकऱ्यांनी चांगलीच धुलाई केली. या प्रकरणाची ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण, वरून दबाव आल्याने सदर तक्रार होवू शकली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गावपातळीवर हा न्याय मिटवण्याचा प्रयत्न चालवला आहे.
….सदर शिक्षकाला सस्पेंट केल्याचे वृत्त…
सदर शिक्षकाला जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी कामावरुन काढून टाकल्याचे वृत्त आहे, आरोपीवर नेमकी कोणती कारवाई होणार हे शनिवारी कळणार आहे. सदर शिक्षक एका प्रसिद्ध नेत्याचा नातलग असल्याचेही सांगण्यात येत आहे..






Leave a Reply