.. मोरबची 164 एक्कर जमिन कुणाच्या लॉगिनमध्ये? जांबोटी की, खानापूर?


तालुका ब्लॉक काँग्रेसचा सज्जड इशारा: जांबोटी तहसील ‘सर्कल’ मध्ये सर्वे नंबर 21,22  हे प्रकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर?

    जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

           एक तहसीलदार, तीन सर्वेअर खात्यातील अधिकाऱ्यांनी लोकायुक्त कारवाईत घरचा रस्ता धरूनही खानापूर ‘तहसील’मधील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची अधिकच भर पडत आहे. याला अधिकाऱ्यांची दादागिरी म्हणावी की, राजकिय वरदान? हे कळेनासे झाले आहे.  तालुक्यातील मुजोर नेते आणि भोळी भाबडी जनता याचा पूरेपूर अभ्यास करून असे प्रकार पुन्हा वाढीस लागले आहेत. असाच मोठा प्रकार जांबोटी तहसील कार्यालय व्याप्तीत येणाऱ्या मोरब (ता. खानापूर) येथील सर्वे नंबर 21 आणि 22 मधील 164 एक्कर जमिनीच्या बाबतीत घडण्याच्या मार्गावर आहे. याची कुणकुण स्थानिक नागरिकांना होती पण, मंत्री,आमदरांसारख्याचे वजन सांगणाऱ्या ‘शिरजोर’ तहसील अधिकाऱ्यांना विचारणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. तितक्यात तालुका ब्लॉक काँग्रेसच्या कानावर हे प्रकरण पडताच, त्यांच्याकडून सज्जड इशारा तहसीलच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे, आणखी अशी काहीं प्रकरणे आमच्या हाती लागली असून, तरीही अधिकाऱ्यांनी चालबाजी केल्यास झेल किंवा लोकायुक्त रस्ता आम्हीं फिक्स करून ठेवल्याची माहिती काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी ‘लोकहित न्यूज’ शी बोलताना दिली.

..तहसीलदार म्हणतात माझ्या लॉगिंगला हे प्रकरण नाही!…

      दरम्यान हे प्रकरण तालुका ब्लॉक काँग्रेसच्या नजरेस येताच, त्यांच्याकडून तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी तहसीलदारांनी हे प्रकरण माझ्या लॉगिंगमध्ये आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. हे प्रकरण हिथेच थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जा!असा इशारा काँग्रेस नेत्यांकडून तहसीलदारांना देण्यात आला. यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महादेव कोळी, सुरेश जाधव, ॲड. राजू नाईक, दिपक कवठणकर, माजी अध्यक्ष बसरिकट्टी उपस्थित होते.

काय आहे हे प्रकरण; यात कुणाचा हात?..

     मोरब (ता.खानापूर)गावच्या हद्दीत सर्वे नंबर 21 आणि 22 मध्ये 164 एक्कर जमिन असून, ती अशीच सरकारी पड, कुणाकुणाला मिळाल्याचे वृत्त आहे, माञ, त्याला कायदेशीर आधार नाही. असे असतांनाही काहीं स्थानीक तहसील अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहीं नेते आणि त्यांचे चेले अशी मिळून असलेल्या एका टोळीकडून ही जमीन लाटण्याचे जोरदार प्रयत्न सूरू आहेत. त्याला राजकीय बळ असू शकतो असाही संशय आहे. हे प्रकरण जांबोटी तहसील व्याप्तीत  येत असून, येथील कोणत्या अधिकाऱ्याचा यामध्ये हात आहे, याचाही शोध सुरू आहे. हूळंद च्या प्रकरणामध्ये सर्वे खात्यातील तीन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला आहे.. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे..

आली रे आता कुणाची पाळी आली; आणखी 4 आधिकारी लोकायुक्त मार्गावर…

    खानापूर तहसील मध्ये आणखी 4 आधिकऱ्यांची झोळी आद्याप रिकामीच असल्याने ते अधिकच धडपड करत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.  त्यामुळे लवकरच त्या चौघांचा नंबर लोकायुक्त डायरीत गिरवला जाणार यात तिळमात्र शंका नाही. तर आणखी चार प्रकरणे तालुका ब्लॉक काँग्रेसच्या नजरेस आली असून, त्यांचाही लवकरच भांडाफोड होणार आहे..

     

प्रतिक्रिया

  मोरब ( ता. खानापूर) येथील 21 आणि 22 सर्वे नंबरमधील 164 एककर जमीन खरेदी घोटाळा प्रकरण आमच्याकडे आले आहे, त्याप्रकरणी आम्हीं तहसीलदारांकडे पाठपुरावा केला असता, त्यांनी हे प्रकरण माझ्या लॉगिन ला नसल्याचे स्पष्टीकरण देत, याबाबत चौकशी करण्याची हमी दिली आहे. अशी आणखी चार प्रकरणे असून, त्याला मुजोर अधिकाऱ्यांचा वरदहस्त लाभला आहे.

  • दिपक कवठणकर, तालुका काँग्रेस नेता.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *