July 21, 2026

इटगी कन्नड माध्यमिक मुलींच्या शाळेच्या लढ्याला यश; शाळा जैशे थेच’ सुरू राहणार..

0
IMG-20251017-WA0105.jpg

शिक्षण खात्याचा आदेश; नागरिकात समाधानाचे वातावरण..

    खानापूर : लोकहित न्यूज

         इटगी (ता.खानापूर) येथील कन्नड माध्यमिक विद्यालय वाद मिटला असून, याच ठिकाणी हे विद्यालय सुरू ठेवण्याचा लेखी आदेश शिक्षण खात्याने जिल्हा शिक्षणाधिकारी आणि बीईओंना बजावला आहे. त्यामुळे इटगी गावच्या विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या लढ्याला यश आले आहे. याकामी माजी आ. तथा अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचेही प्रयत्न कामी आले आहेत, त्याबद्दल नागरिकांतून निंबाळकर यांचे आभार मानण्यात येत आहेत. या शाळेमध्ये 42 विद्यार्थी असलेली ही शाळा नियमात बसत असल्याने वरील आदेश सरकारने बजावला आहे. शिक्षण मंत्री मधू बांगारप्पा, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, प्रधान सचिव रश्मी जी यांनी याप्रकरणी दखल घेवून समस्या सोडवल्याबद्दल माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंत्री आणि सरकारचे गावकऱ्यांच्यातर्फे विशेष आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *