गेल्या दोन दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण; रवीवारी बंगळूरला पावसाने झोडपले, गुरुवारपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट ‘
बंगळूर: लोकहित न्यूज
यंदा वेळेआधी केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याने मान्सूनपूर्व पावसाची जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेळगांवसह कारवार, मंगळूर बंगळूर किनारपट्टीवर अनेक ठिकाणीं पावसाने जोरदार हजेरी लावली. बंगळूरच्या सकल भागांत रवीवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. परिणामी बहुतेक महत्वाच्या भागांत जोरदार पाऊस पडल्याने रस्ते, शहरातील परिसर पाण्याने तुंबला होता. अनेक घरे पाण्यात गेलीं तर कारसह इतर वाहने पाण्यावर तरंगत होती. चार दिवसाआधीच हवामान खात्याने कर्नाटकच्या किनारपट्टीवर ‘येलो अलर्ट ‘ अर्थात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. सद्याचे वातावरण पाहता, गुरुवारपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट ‘ कायम असेल असे हवामान खात्याने पुन्हा जाहीर केले आहे. त्यामुळें येत्या तीन दिवसात कर्नाटकच्या किनारपट्टीवर जोरदार मान्सूनपुर्व पडण्याची शक्यता आहे.

रविवारपासून वातावरणात बदल झाला असून, या तीन दिवसांत क्वचितच सूर्य दर्शन झाले. आकाशात ढगांनी दाटी केली असून, कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण मंगळवारी सकाळीं दिसत होते. पश्चिम बंगाल उपसागरातील हवेचा प्रवाह तमिळनाडूकडे सरकल्याने चेन्नई , कांचीपुरम, तिरूवल्लीपूर सह लगच्या भागांत पावसाच्या सरी बरसल्या. बंगळूरमध्ये रवीवारी 105 मिमी पाऊस झाला असून, 1909 साली या काळात बंगळूरमध्ये 153 मिमी पाऊस झाला होता, त्यानंतर रवीवारी जोरदार पाऊस पडला. येत्या तीन दिवसांत पुन्हा बंगळूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी मुंडी जिल्ह्यातील सुंदरनगर परीसरात वादळाने झाडे उन्मळून पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले..
वातावरण पोषक; मान्सूनच्या जोरदार सलामीची शक्यता..
रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल झाल्याने कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचलप्रदेश च्या किनारपट्टीरील मान्सूनपुर्व पाऊस धडकला. मंगळवा सकाळपासूनच आकाशात ढगांनी दाटी केली होती. एकंदरीत मान्सूनपुर्व पावसाची तयारी पाहता यंदा मान्सूनच्या जोरदार सलामीचे चित्रं दिसत आहे.
फोटो – बंगळूर: जोरदार पावसाने सर्वत्र तळ्यांचे रूप आल्याने नागरिकांना जेसीबीसह मिळेल त्या साधनांचा आधार घ्यावा लागला..
Leave a Reply