झुंजार नेतृत्व हरपले; भाजप नेते उदय भोसले यांचे अपघातात दुर्देवी निधन…
करंबळ : लोकहित न्यूज
नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे करंबळ ( ता. खानापूर) येथील रहिवाशी तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका नेते उदय भोसले (वय.42) यांचे देसूरजवळ अपघातात दुर्देवी निधन झाले. पाठीमागून भोसले यांच्या दुचाकीला अज्ञात कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले सैनिक प्रशांत पाटील (वय -42 ) यांनीही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी तालुक्यात समजताच एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई -वडील असा परिवार आहे. ही बातमी कळताच आ. विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी , सुरेश जाधव, तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आय.आर.घाडी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. धडक दिलेल्या कारचा शोध घेवून त्यांच्यावर पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे….. लोकहित न्यूज तर्फे उदय भोसले यांना ‘भावपूर्ण श्रद्धांजली ‘…

