बैलूर पंचायतीचा ‘देवाचीहट्टी’अंगणवाडी इमारतीला ‘शॉक ‘ ?


पीडीओ,सेक्रेटरी’ बॉस’ ; पंचायत अध्यक्ष – सदस्यांचे कायच चालेना ; आता जनततेने जावे कुठे?

देवाचीहट्टी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

       जांबोटी जिल्हा पंचायत विभागातच मोठी पंचायत म्हणून ओळख असलेल्या बैलूर ग्राम पंचायतीचा कारभार म्हणजे !आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय ! असा होवून बसलाय. लोकप्रतिनिधी म्हणून अध्यक्ष आणि सदस्य हे नामधारी असून, पीडीओ, सेक्रेटरी -ऑपरेटर हे कर्मचारीच ‘बॉस’ होवून बसले आहेत. त्यामुळे  अध्यक्ष सदस्यांचे काय चालेनासे झाले असल्याचे चित्रं असून, लोकप्रतिनिधींची अवस्था अशी असेल तर जनतेने कुठे जावे? असा डोंगराएवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देवाचीहट्टी येथील नविन इमारतीचे बांधकाम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून, ‘स्लॅब’ ला आले आहे, असे असताना इमारतीच्या मागच्या बाजूने गेलेल्या वीजवाहिन्यामुळे ( लाईट तारा) हे काम हीथेच थांबले आहे. सदर धोकादायक लाईट तारा हटवण्यासाठी पंचायतीचे हेस्कॉमला(केएबी ) लेटर हवे आहे, त्यासाठी ग्राम पंचायत सदस्य प्रदिप कवटणकर शिवाय नागरिकांनीही अनेकवेळा सांगूनही महिना उलटला तरी पीडीओ -सेक्रेटरी यांचे डोळे उघडेनासे झाले आहेत. काय म्हणावे या कारभाराला? या कामात कमिशन टक्के  नाहीत का? म्हणून इतका लेट केला जातोय तो! त्यामुळे हे अधिकारी विकास करण्यासाठी आहेत की, ‘भकास’ असा प्रश्न जनतेला पडला आहे. येत्या चार दिवसात या कामाचा पाठपुरावा नाही झाला तर हे प्रकरण पंचायत अधिकाऱ्यांना चांगलेच शेकू शकते हे मात्र, नक्कीच! जिल्हा पंचायतीच्या वारीवर जनता जाईल असा इशारा लोकहित न्यूज कडे देण्यात आला आहे.

….अनेक वर्षानंतर मिळणार बिचाऱ्या बालकांना ‘असरा ‘ तर पंचायत आधिकारी म्हणतात हे सगळ विसरा!  अध्यक्ष -सदस्यांचे डोक्यावर हात…?

      पिढ्यापिढ्या आणि अनेक मी मी म्हणणारे सदस्य होवून गेले पण, आजतागायत गावच्या चिमुकल्या बालकांनी कधी मंदिर तर जुनाट कौलारू चव्हाटा असे दिवस काढले आहेत. आताच कुठे बिचाऱ्या बालकांना चांगले दिवस येतील म्हणजे मध्येच माशी शिंकल्या प्रमाणे पंचायतीने झोपेचे सोंग घेत भिजत घोंगडे ठेवले आहे. काय म्हणावे या कारभाराला? अलीकडच्या काळात जांबोटी भागातच बैलूर पंचायतीत येणारे आधिकारी ‘बॉसगीरी’चा वेश धारण करतात . आणि अध्यक्ष सदस्यांना मात्र, डोक्याला ताप करून घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही! तर दुसरीकडे अशा मीपणा च्या आधीकाऱ्यांना धडा शिकवण्याचे धाडस सद्याच्या अध्यक्ष -सदस्यांमध्ये दिसत नाही! आणि त्यामुळेच हे अधिकारी इतके ‘माजलेत ‘ यांना आता जनतेनेच दणका देण्याची वेळ आली आहे.

  

प्रतिक्रिया –

    मी अनेकवेळा पीडीओ -सेक्रेटरी पुंडलिक हेब्बाळकर यांना या समस्येबद्दल पूर्वकल्पना दिली आहे. एक महिना उलटला तरी यांचे डोळे उघडेणासे झाले आहेत. येत्या चार दिवसात या समस्येचा पाठपुरावा झाला नाहीं तर जिल्हा पंचायत सीईओंकडे तक्रार करावी लागेल.

प्रदिप कवटणकर, ग्राम पंचायत सदस्य देवाचीहट्टी.

मी पीडीओंना या समस्येबाबत सांगितले आहे, लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात येईल, याची पीडीओंनीही दखल घेण्याची गरज आहे…

  • पुंडलिक हेब्बाळकर, सेक्रेटरी ग्राम पंचायत बैलूर.

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *