मंत्री सतीश जारकीहोळी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?


मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र येतींद्र यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण निघाले ढवळून…

बंगळूर: लोकहित न्यूज नेटवर्क..

     कर्नाटकच्या राजकारणाच्या कहाणीत आणखी एक ट्विस्ट येण्याची चिन्हें दिसत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, मुख्यमंत्रीपदाची माळ बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याचा खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र यांनी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान याचा दुजोरा दिला आहे. त्यामुळे यावेळीही उपमुख्यमंत्री असलेले डी. के. शिवकुमार यांना शह देणार का? की शिवकुमार कोणते डावपेच खेळणार? अशीच सध्याची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यातींद्र यांनी आमचे वडील आता राजकारणातून निवृत्ती घेणार असून, पुढील मुख्यमंत्री म्हणून बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनाच अधिक पसंती असेल असे मला वाटते असे वक्तव्य त्यांनी केले. याबाबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना विचारले असता, आम्हीं मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि मी दोघे मिळून एकत्र काम करत आहोत, मुख्यमंत्रीपदाबाबत हायकामांडच निर्णय घेवू शकेल असे प्रत्युत्तर शिवकुमार यांनी बोलतांना दिले.  सत्ताधारी पक्षाची सद्याची राजकीय परिस्थिती पाहता मंत्री सतीश जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे समर्थक आहेत, तर डी. के शिवकुमार यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नेहमीच या दोन्हीं गटांची ओढाताण होत असते, अशावेळी हायकामांडच्या मध्यस्थीने पुन्हा गाडी रुळावर येते. मागच्यावेळी काहीं आमदारांनी विरोधी सुर आवळला होता, लागलीच दिल्ली हायकांड ने मध्यस्ती करून हा बंड शमविला होता. यावेळीही असेच राजकीय चित्र दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *