‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…


पक्षनिष्ठा, उत्तम संपर्क पक्षबांधणीची पोचपावती; तालुक्यातून अभिनंदन…

    खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     तालुक्याचे प्रभावी भाजप नेते व लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप) चे एमडी सदानंद पाटील यांची जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षनिष्ठा, जिल्हा व तालुक्यात उत्तम संपर्क, पक्षबांधणी शिवाय तळागाळातील लोकांशी जवळचे संबंध असल्यामुळेच सदानंद पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या समस्यां सोडवण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतील अशी आशा शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.  लोकहित न्यूज तर्फे सदानंद पाटील यांचे खूप खूप आभार…

तालुक्यातून सदानंद पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव….

      उत्तम वकृत्व, उत्तम सुशासन आणि तालुक्यातील तळागाळातील लोकांशी जवळचे संबंध, त्यांच्या समस्यांसाठी तत्पर असे नेते म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यामुळे सामान्य नागरिकापासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जांबोटी युवा भाजप नेते दौलत कोलीकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले की, सदानंद पाटील यांची निवड ही तालुका आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा आम्हीही आदर करतो, ते शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळवून देतील अशी आम्हाला आशा आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *