देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …
राज्य सचिवांकडून यादी जाहीर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार…
बंगळूर /खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्याच्या अभिमानात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील देवलत्ती माध्यमिक शाळेची प्रधानमंत्री श्री अर्थात पीएम श्री योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. नुकतीच राज्यातील माध्यमिक शाळांची यादी राज्य सचिवांनी जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने आपल्या तालुक्यातील शाळेचा सन्मान केज्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर यांनी सरकारचे आभार मानले आहेत. राज्य शिक्षण खात्याचे अतिरिक्त सचिव व्हि. रश्मी महेश यांनी बेळगांव जिल्ह्यात खानापूर तालुक्यातील देवलत्ती या एकमेव कन्नड माध्यमिक शाळेची निवड झाली आहे, असे जाहीर करताच विजयपुर, कलबुर्गी, गदग, शिवमोगा जिल्ह्यातीलही शाळांची निवड झाल्याची यादी जाहीर केली आहे.
