गर्लगुंजी प्रसाद पाटील, निट्टूर एसडीएमसी कमिटीचे बीईओंना निवेदन..
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) !शैक्षणिक !

आधीच मराठीवर होणारा अन्याय आणि त्याच आता मराठी पुस्तकात असंख्य चुका शिवाय खानापुरातील शिक्षक इतरत्र बदली करून घेऊन जात आहेत, त्यामुळे मराठी शाळांचे किती हे नुकसान? असे प्रश्न विचारत युवा सामाजिक कार्यकर्ते व गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील व निट्टूर मराठी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीने बीईओ पी. रामप्पा यांना निवेदन दिले. प्रसाद पाटील व निट्टूर शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागराज देसाई यांनी बीईओना सदर निवेदनात म्हटले आहे की, मराठी पुस्तकांमध्ये असंख्य चुका आहेत, त्यामुळे मुले शिकणार कशी? आधीच शिक्षकांची कमतरता असताना त्यात मराठी पुस्तकात असंख्य चुका झाल्याने शैक्षणिक समस्या निर्माण झाली आहे, अर्धवट शिक्षण, त्यात तालुक्यातील शिक्षक दुसऱ्या तालुक्यात बदली करून घेऊन जात आहेत, यावरही अंकुश लागला पाहिजेत. आधीच मराठी शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असून, त्यात आता इतर तालुक्यात येथील शिक्षक बदली करून घेऊन जात आहेत, त्यांना सोडू नका! यापुढे तरी मराठी माध्यम पुस्तकात चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.
यावर बीईओ पी रामप्पा यांनी, आपण सादर केलेले निवेदन जिल्हाशिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून यापुढे अशा समस्या होणार नसल्याची हमी दिली. यावेळी निट्टूर मराठी शाळा सुधारणा कमिटीचे उपाध्यक्ष संतोष चोपडे, सदस्य परशराम पाटील, कल्लाप्पा गुरव, नागेश कांजळेकर, रवळनाथ कुसमळकर, रॉबर्ट डिसोझा, शंकर कमार आदी उपस्थित होते.






Leave a Reply