समाजासाठी वाहून घेतलेले अभ्यासू नेतृत्व; कुशल संघटनात्मक कामगिरीच्या जोरावर जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी कायम…
खानापुर : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
खानापुरात अनेक नेत्यांची मांदियाळी असतांना त्यामध्ये सामान्यांना आवाज कोण? असा प्रश्न पडतो. तेंव्हा एकच नाव पुढे येत ते म्हणजे जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांचे. कुशल संघटन आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहीले जाते. समाजाच्या आणि सामान्य नागरीकांच्या समस्यांसाठी नेहमीच वाहून घेणारे नेते म्हणूनही त्यांची ख्याती जिल्हाभर पसरली आहे. अशा या लोकप्रिय नेत्याचा उद्या (शुक्रवार दि. 2 जानेवारी) मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत आहे, त्यानिमित त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
…गल्ली ते दिल्लीपर्यंतचा ओळखीचा नेता…
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या कोणत्याही कामाची पूर्तता करण्याची क्षमता प्रमोद कोचेरी यांच्यामध्ये आहे, खानापूर वा कोणत्याही गावची समस्या ते तत्काळ मार्गी लावतात, अशी त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली आहे. प्रमोद कोचेरी यांचे खासदार विश्वेश्वर कागेरी -हेगडे यांच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे बंगळूर ते दिल्लीपर्यंतचे कोणतेही काम ते मार्गी लावतात. शिवाय विधान परीषद खासदार इराण्णा कडाडी यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे असलेले कोणतेही काम वा समस्या सुटण्यास वेळ लागत नाही . त्यामुळेच त्यांच्याकडे तालुक्याची ढीगभर कामे पडून असतात.
सर्व भाषिक असल्याने सरकारी कार्यालय दबदबा…
मुळात कन्नड भाषिक आणि त्याच बरोबर मराठी, हिंदी भाषेवर चांगलाच प्रभाव असल्याने श्री. प्रमोद कोचेरी यांचा तालुका आणि जिल्हा सरकारी कार्यालयात चांगलाच दबदबा आहे. महसूल, वनखाते, पोलिस स्थानकासह सर्वच कार्यालयांतील अधिकारी त्यांचे कोणतेही काम पेंडिंग ठेवत नाहीत. त्यामुळेच तालुक्यात जनसामन्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक कार्यात सतत वाहून घेणारे नेतृत्व…
तालुक्यातील कोणत्याही गावच्या समस्यांसाठी ते नेहमीच वाहून घेऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असेही त्यांना संबोधिले जाते. खानापूर ते मोदेकोप बससेवा कोचेरी यांचा प्रयत्नातून सुरू झाली. बंगळूरपर्यंत आवाज उठवून खानापूर बस स्थानकात वारंवार पाठपुरावा करत मोदेकोप गावात बस आणली. त्याबद्द्ल त्यांचा गावकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला.
गणेबैल ते लोंढा महामार्गावरील खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी प्रयत्न…
बेळगांव व्हाया रामनगर फोंडा पणजी मार्गावरील गणेबैल ते लोंढा दरम्यानच्या खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी प्रयत्न करून ते करून घेतले. या मार्गात एकूण दहा पंचायती येतात त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या कित्येक खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी बंगळूर -दिल्लीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे काम मार्गी लागले.
अखंड ‘हिंदु राष्ट्र’साठी घेतले व्रत…
आरएसएससह बहूतेक हिंदू संघटनांमध्ये तळापासून श्री. प्रमोद कोचेरी कार्यरत असतात. त्यामुळे ते अशा सर्व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी सर्वच कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले असून, आमदारसह पक्षाने लढविलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली आहे. तीही जबाबदारी ते अगदी प्रामाणिकपणे पार पाडताहेत.. त्यामुळेच त्यांची तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
….पश्चिम भागासाठी विशेष प्रयत्नशील…
तालुक्यासह जांबोटी पश्चिम भागातील समस्या सोडवण्यास विशेष प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रमोद कोचेरी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. या भागातील समस्या सोडवण्यास माझे विशेष प्राधान्य असेल असेही ते म्हणाले. भविष्यात या भागातील समस्यांकडे माझे बारीक लक्ष राहील, त्याच दिशेने माझी वाटचाल असेल असेही श्री. कोचेरी म्हणतात..
शुक्रवारी या ठिकाणी साजरा होईल वाढदिवस; सर्वांना आग्रहाचे आमंत्रण…
शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता खानापूर पर्यटन निवास याठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तरी सर्व कार्यकर्ते हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे..







Leave a Reply