‘शोले’ फेम धर्मेंद्र सिंह देवोल  यांचे निधन…


उत्तम अभिनेता, निर्माता म्हणून ओळख; पकृती खालावल्याने 89 वर्षी प्राण ज्योत मालवली…

मुंबई: लोकहित न्यूज

     हिंदी सृष्टीतील गाजलेल्या ‘शोले ‘या चित्रपटातील वीरू या भूमिकेमुळे गाजलेल्या सनी देओल आणि बॉबी देओल यांचे वडील धर्मेंद्र सिंह देओल यांचे आज सकाळी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. उत्तम अभिनेता -निर्माता अशी त्यांची ओळख होती. त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवसांपासून ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते.

    


तब्बल सहा दशके हिंदी सृष्टीत अधिराज्य…

      सहा दशकांच्या कारकीर्दीत धर्मेंद्र यांनी ‘शोले’ या चित्रपटापासून ते चुपके चूपके, सिता और गीता, हे त्यांचे हिट झालेले सिनीमे. अलीकडची काहीं वर्षे जरी ते फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असले तरीही त्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांनी 1960 ला दिल भी तेरा हम भी तेरा या चित्रपटापासून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. धरमवीर, अखोंको बरात! सारखे गाजलेले चित्रपटात त्यांनी उत्तम भूमिका साकारली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *