देशाच्या ऐतिहासिक लालकील्याजवळच स्लोमध्ये जाणाऱ्या कारमध्ये झाला स्फोट, केंद्रीय यंत्रणा, दिल्ली पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, देशात हाय- अलर्ट जारी...
दिल्ली: ( विलास कवठणकर) लोकहित न्यूज नेटवर्क
देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी 6.53 मिनिटांनी ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल किल्ल्याजवळ स्लो धावणाऱ्या कारमध्ये झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून, जखमी झालेल्या आणखी 12 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाने देश हादरला असून, मुंबई, पुणे, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद, लखनौ, पणजी अशा महत्वाच्या शहरांसह सर्वच राज्यांमधील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, दिल्ली पोलिसांकडून या घटनेचा आढावा घेण्यात आला असून, तात्काळ या घटनेची नेमकी माहिती देशासमोर येईल, अशी माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी बोलतांना दिली. एकीकडे केंद्र सरकार आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा जम्मू -काश्मीरमध्ये होणारा दहशतवादी हल्ला उधळून लावला असे सांगत असतांनाच दिल्लीत, तेही महत्वाच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ इतका मोठा स्फोट कसा काय होतो? असाच प्रश्न देशाला पडला आहे. त्यामुळे दिल्लीत स्फोट कोणाकडे बोट ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे 11 तारखेला होणाऱ्या बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे..
स्फोट झालेल्या कारमधील मृतदेहांचे तुकडे हवेत; बाजूने जाणारे 12 जण गंभीर जखमी…
लाल किल्ल्याजवळ झालेला हा स्फोट इतका भयानक होता की, स्फोट झालेल्या कारमधील मृतदेहांचे तुकडे हवेत उडून पडले. त्यावेळी उपस्थित असलेल्या रिक्षचालकांनी याची माहिती देताना, ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. किल्ल्याजवळून अगदी स्लोमध्ये चाललेल्या कारमध्ये हा अपघात झाला, नेहमीच गजबजलेल्या या महत्वाच्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असल्याने त्याची झळ लगतच्या नागरीकांनाही बसली, त्यामुळे लगतचे 12 जण गंभीर जखमी अवस्थेत सापडले, त्यांना तात्काळ लगतच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
कौन है ओ , जो खून की होली खेल रहा है… दिल्लीत यापूर्वी अनेक घटना…
अलीकडच्या काळात देशाच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटना राजकीय स्वार्थासाठी घडवून आणल्या जात आहेत का? दिल्लीच्या इतक्या गजबजलेल्या परिसरात इतका मोठा स्फोट होतो, त्यासाठी ही स्फोटके येतात कोठून असा प्रश्न पडतो. त्यामुळे कौन है ओ जो खून होली खेल रहा है! असेच वाक्य दिल्लीकरांच्या तोंडून आले नाही तर नवलच! यापूर्वीही देशाच्या राजधानीचे अशा घटना पाहिल्या आहेत, त्यामुळे देशाची सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाली आहे का? की त्यांना कोणी कमकुवत करतय! सरकार कोणाचेही असो हल्ले, जातीय तेढ, दंगली या ठरलेल्याल्याच! एक नेपाल आणि जपानसारखी, नेत्यांना पळवून मारण्याची वेळ नागरिकांवर येणार असल्याचे चित्रं दिसू लागले आहे.
बड्या बड्या बाता…..
नेहमीच सत्ताधारी नेते मंडळी जोर जोरात देशप्रेमाची भाषा करतांना दिसते. प्रत्यक्षात मात्र, काहीच होतांना दिसत नाही. मग ते कोणाचेही सरकार असले तरी निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ हा ठरलेलाच! हा प्रकार कधी थांबणार? पहलगाम हल्ल्याबाबतही उलट सुलट चर्चा रंगल्या होत्या, सुरवातीला सरकारलाही या घटनेतील हल्लेखोरांना शोधणे जड गेले, कारण, या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच सरकारकडून हल्लेखोरांची चित्रे प्रसिद्ध करण्यात आली पण, त्यानुसार तपास लागण्यास विलंब झाला, तो कशासाठी? जम्मू काश्मीर च्या खोऱ्यात तर पावलापावलावर सुरक्षा यंत्रणा तैनात केलेली असतांनाही हल्लेखोर कसे काय? आत घुसतात… हा मोठा चिंतनाचा विषय आहे. पण, त्यानंतर काही दिवसातच हल्लेखोरांचा खत्मा केल्याचा बातम्या आल्या. मात्र, त्यामध्येही तथ्य होते काय? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच आहे.. राजकीय स्वर्थासाठी होणाऱ्या अशा घटना थांबणार तरी कधी? की, सुस्त भारतीय नागरीकांना नेपाल -जपान सारखे जागे व्हावे लागेल का?असा सवाल उपस्थित होत आहे.
पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्र्यांकडून आढावा…
या घटनेची माहिती समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून या घटनेच्या आढावा घेण्यात आला असून, या सर्वांनी याबद्दल शोक व्यक्त केला . वेळोवेळी मी घटनेची माहिती घेत असून, तात्काळ या घटनेचा तपास लावण्यात येईल अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.






Leave a Reply