माचीगड साहित्य संमेलन: साहित्य म्हणजे एकत्र संवाद; गावच्या संस्कृतीचे कौतुक ,मनातून ओतणारे हेच खरे साहित्य, ग्रंथदिंडीने मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन; संमेलनाध्यक्षांचे प्रतिपादन..
विलास कवठणकर: लोकहित न्यूज!माचीगड -अनगडी ( सुब्रमण्यम साहित्य अकादमी)
स्त्री ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा पैलू असून, तिचा बरोबरीने सन्मान केला पाहिजे. साहित्य संमेलन म्हणजे एकत्र संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणे होय. स्त्री साहित्यालाही जुनी परंपरा लाभली असून, स्री साहित्याची सुरवात ही ओव्यांनी झाल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी मांडले . सुब्रमण्यम साहित्य अकादमी यांच्यावतीने माचीगड -अनगडी (ता.खानापूर) येथे आयोजित केलेल्या 29 व्या माय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील व वास्तुविशारद पिटर डिसोझा यांनी स्वागत केले.
पुढे, बोलतांना प्रा.डॉ. संजीवनी तडेगावकर म्हणाल्या की, या गावचे आणि आजूबाजूचे वातावरण पाहून मी भारावून गेले. येथील माणसे मराठी भाषेवर नितांत प्रेम करणारी असल्याने इतकी वर्षे ही परंपरा आपण अविरतपणे सुरूच ठेवलात याचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. जेवढे कठीण प्रसंग येतील तेवढी अप्रुकता वाढते अन् साहित्यही तितकेच समृद्ध होते. हे साहित्य संमेलन वेगवेगळ्या वळणांवर घेऊन जाणार आहे, असे मला वाटते. तसा बेळगावचा साहित्य स्नेह फार जुना आहे, 1939 व 1946 ला बेळगावमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली होती. बेळगांव, कारवार, धारवाड जिल्ह्यामध्ये मराठी प्रथम तर कन्नड ही दुसरी भाषा म्हणून पूर्वी बोलली जायची. ध्येयाने प्रेरित होणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे उदाहरण देता येईल अशाही त्या शेवटी बोलतांना म्हणाल्या.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी …
व्यासपिठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, डॉ. रफीक हलशीकर, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, माऱ्यापा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह.भ.प मारूती महाराज व मारुती आसोंदे यांच्याहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. सुब्रमण्यम पूजन लक्ष्मण पाटील यांच्याहस्ते, प्रभाकर पारीश्वाडकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी पुतळ्याला मालार्पण करण्यात आले. थोर समाजसेविका कै. सिंधुताई सपकाळ साहित्य नगरीचे उद्घघाटन वनदेवी सोसायटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर, आखिल भारतीय बंजारा समाजाचे अध्यक्ष यमनापा राठोड यांच्याहते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्याहस्ते, सुब्रमण्यम साहित्य व्यासपीठाचे उद्घघाटन खानापूर बँकेचे अध्यक्ष अमृत शेलार यांच्याहस्ते, एकनाथ गावडा, ललिता पाटील, सुनिल पाटील, रणजीत शामराव पाटील, प्रशांत लक्केबैलकर, यांच्याहस्ते विविध पूजने पार पडली. आर. बी. पाटील, यालापा बाजंत्री, दत्तू कुट्रे, हेमंत देसाई, श्री.तडेकर,जयवंत पाटील, शामराव पाटील, शंकर गौडा (माणिकवाडी) यांच्यासह आमंत्रित मान्यवर आणि परिसरातील मराठीप्रेमी उपस्थित होते.
मराठीसाठी आम्हीं कायमच सज्ज: आमदार विठ्ठल हलगेकर…
मराठी ही आमची मायबोली असून, तिच्या रक्षणासाठी आम्हीं कायम सज्ज राहूया असे सांगतानाच, लोकांच्या प्रयत्नाने मराठीचा जागर होतोय हे कौतुकास्पद आहे. येथील मराठी चळवळ मोठी असून, आम्हीही यासाठी कायम प्रयत्नशील राहू अशी हमी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बोलतांना दिली.
यावेळी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी येथील साहित्य अकादमी आणि नागरिकांचे कोडकौतुक केले. कोणत्याही गोष्टीसाठी सातत्याची आवश्यकता असून, त्यातूनच यश मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील बोलतांना म्हणाले की, साहित्य संमेलने ही मराठी माध्यमांमुळे जीवंत राहिली आहेत, त्याला आम्हीं सर्वांनी मिळून अधिकच बलवान बनवूया असेही ते म्हणाले.
यावेळी दैनिक सकाळचे खानापूर प्रतिनिधी संदीप सत्तार यांचा उत्कृष्ठ वार्ताहर म्हणून मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष संजीव वाटूपकर यांनी सूत्रसंचालन केले तर एम. पी. गिरी यांनी आभार मानले.


(सूचना – कवी संमेलन आणि ग्रंथ दिंडी चे वृत्त उद्या प्रसिद्ध करू)






Leave a Reply