July 21, 2026

सन्नहोसुर येथील स्वातंत्र्यसेनानी दत्तू कल्लाप्पा पाटील काळाच्या पडद्याआड…

0
IMG-20260105-WA0049.jpg

शिक्षक ते स्वातंत्र्य सैनिक असा 95 वर्षांचा प्रवास सुखद; मोठ्या कुटुंबाचे सेनानी…

खानापूर:  लोकहित न्यूज (विशेष जाहिरात)

सन्नहोसूर (तालुका खानापूर) येथील रहिवासी स्वातंत्र्य सेनानी तसेच प्रसिद्ध शिक्षक म्हणून ओळख असलेल्या थोर विचार विचारवंत दत्तू कल्लाप्पा पाटील यांचे 25 डिसेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. आज त्यांच्या अकराव्या दिवसानिमित सर्व स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांचे ते आजोबा होत.

     

95 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला..

      गेल्या 4 सप्टेंबर 2025 रोजी 95 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दत्तू कल्लाप्पा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. ते एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सुरवातीला त्यांनी मुढेवाढी येथे शिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. त्यामुळे त्याचा एक वेगळाच आदर्श समाजात होता. तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील, अजित अर्जुन पाटील, अमोल अर्जुन पाटील, अमृत आ. पाटील, शंकर र. पाटील, विक्रम पाटील, प्रकाश दत्तू पाटील, अर्जुन पाटील, रमेश द . पाटील मुलगी शेवंता पाटील नातवंडे पनतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पश्चात आहे. लोकहित न्यूज तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *