शाळेचा कायापालट करणार: नूतन अध्यक्ष सागर दळवी…


जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव ( जांबोटी) शाळा सुधारणा समितीची निवड, उपाध्यक्षपदी महेश देसाई…

जांबोटी: लोकहित न्यूज ..

      ज्या शाळेतून मी घडलो, त्या विद्यामंदिराचे ऋण फेडण्यासाठी गावकरी आणि पालकांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे, त्याचा आदर राखत शाळेचा कायापालट करण्याचे मी व्रत धरले आहे . यासाठी गावकरी शिक्षक आणि पालकांचाही मला मोठा पाठिंबा मिळेल असा मला विश्वास वाटतो, असे मत वडगांव ( जांबोटी) मराठी प्राथमिक शाळा समितीचे नूतन अध्यक्ष सागर दळवी यांनी मांडले. नुकतेच जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शाळा सुधारणा समितीची निवड करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. तर उपाध्यक्षपदी महेश देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना, सुनिल देसाई म्हणाले की, सागर दळवी हे युवा कार्यकर्ते असून, त्याच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत, त्या ते नक्कीच पूर्ण करेल असा मला विश्वास आहे, शिवाय शाळेच्या विकासात अध्यक्ष म्हणून दळवी यांनी मोठे योगदान देतील असेही श्री.देसाई म्हणाले.       

      यावेळी सदस्य म्हणून गणपती पाटील, परसराम देसाई , उमेश देसाई, संचीता देसाई, दिपा देसाई, नेत्रा देसाई, रेणुका पाटील, प्रियंका देसाई यांची निवड करण्यात आली. यावेळी जांबोटी पीकेपीएस सोसायटीचे संचालक जयवंत देसाई, माजी विद्यार्थी संघटनेचे सुरेश देसाई, उत्तम देसाई, तातोबा देसाई, मुख्याध्यापिका आशा देवगेकर, सहशिक्षिका ममता के. यांच्यासाह गावकरी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *