देवाचीहट्टी प्राथ.मराठी शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी तुकाराम कुंभार…


उपाध्यक्षपदी शंकर बामणेसह सदस्यांची उत्साहात निवड…

   

विलास कवठणकर: देवाचीहट्टी लोकहित न्यूज

            देवाचीहट्टी ( ता. खानापूर) येथील मराठी प्राथमिक शाळा सुधारणा कमिटीची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून, तुकाराम कुंभार यांची अध्यक्ष म्हणून तर शंकर बामणे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पालक संजय बामणे होते. शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद सर यांनी सूत्रसंचालन करतांना, शाळा सुधारणा कमिटीचे महत्व आणि त्यांचे कर्तव्य याबद्दल पटवून दिले. यावेळी कमिटी सदस्य म्हणून संजय बामणे, किरण कवठणकर, अमृत कलमनकर, शांताराम कवटणकर, सतीश धुरी, बाबू गावडे, दिपक बामणे, अश्विनी बामणे, गीता गावडे, स्वप्नाली स. धुरी, लक्ष्मी प.गावडे, रुपाली दि. बामणे, मलप्रभा बुरुड, खुशी कवठणकर, लक्ष्मी वि. धुरी, यलूताई ना. बामणे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी शाळेच्या दोन्हीं सहशिक्षिका उपस्थित होत्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *