बैलुर रोडला सोनारवाडीजवळ पीडब्लूडीच्या (pwd) रस्त्यावर ‘अतिक्रमण ‘


नागरिकांची तक्रार; पाहणी करुन कारवाई करण्याचा बांधकाम खात्याचा इशारा ..

विलास कवठणकर: लोकहित न्यूज

      बैलुर ( ता. खानापूर) रोडवर सोनारवाडीजवळ दोघांनी दोन्हीं बाजूला पीडब्लूडीच्या मालकीच्या रस्त्यावर गटार काढून अतिक्रमण केले आहे. परिणामी हे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने बससह बेळगांव – बैलूरकडे ये -जा करणाऱ्या खासगी वाहनांना बाजू देतांना अडचण होत आहे, याबाबत पीडब्लूडीचे तालुका अधिकारी संजय गस्ती यांच्याशी संपर्क साधला असता, तत्काळ या जागेचा पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी लोकहित न्यूज शी बोलताना सांगितले.

  

रस्त्यावरच दोन्हीं बाजूला गटारींवर अतिक्रमण…

सदर दोघांनी घर, गोटा बांधून त्याच्या समोरून जाणाऱ्या पीडब्लूडीच्या रस्त्यावर दोन्हीं बाजूला गटारीतून अतिक्रम केले आहे. त्यामुळे याठिकाणी रस्ता अरुंद बनला असून, येथून दोन वाहने पास होणे कठीण बनले आहे. हे अतिक्रमण कोणत्या आधारे केले आणि कोणाच्या वरदहस्ताने केले याची पीडब्लूडीकडून चौकशी व्हावी अश मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

प्रतिक्रिया –

सदर अतिक्रमणामुळे आम्हाला ये- जा करतांना त्रास होत आहे, अनेकवेळा सांगूनही संबंधितांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष चालविले आहे. याची PWD खात्याने चौकशी करून रस्ता मोकळा करुन द्यावा अशी आमची मागणी आहे.

दामोदर नाकाडी, बैलुर कृषी पत्तीन संघ अध्यक्ष तथा नूतन नंदगड मार्केटिंग संचालक.

आमच्या रस्त्यावर अतिक्रमण करणे चुकीचे आहे, ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहे, त्याची तात्काळ चौकशी केली जाईल. शिवाय रस्ता मोकळा होईल.

संजय गस्ती, तालुका पीडब्लुडी आधिकारी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *