…आता कुणकुंबीतील युवक बनणार सदृढ


जांबोटी भागात प्रथमच कणकुंबी ग्राम पंचायतयतीकडून युवकांसाठी व्यायाम शाळेचे उद्घघाटन ; मान्यवरांची उपस्थिती..

    कणकुंबी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         आजकालची युवा पिढी मोबाईलसह जीवन नाश होणाऱ्या मार्गाला लागली आहे, त्यामुळे त्यांचे भविष्य अंधातरीच राहण्याची भीती आहे. परिणामी दिवसरात्र मोबाईलमध्येच गुंतून राहून ना कोणता व्यवसाय वा शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यास आजच्या युवकांना वेळच नाही. याला फाटा देण्यासाठी कणकुंबी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीने सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यामुळे युवकांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होणार आहे. पंचायतीकडून नुकतेच कुणकुंबीत व्यायाम शाळेचे उद्घघाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.   

       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायतीला प्रशासक म्हणून लाभलेले विजयकुमार, कणकुंबी कॅनरा बँकेचे व्यवस्थापक अण्णा रेड्डी, मावळते ग्राम पंचायत अध्यक्ष सर्व,सदस्य पिडीओ सुनील अंबारे  उपस्थित होते.

कणकुंबी उच्च प्रा. मराठी शाळेचे मुख्या. एम. डी .मुल्ला यांचा सत्कार करताना पिडीओ सुनिल आंबारे, कॅनरा बँक मॅनेजर अण्णा रेड्डी आदी..

कणकुंबी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक एम. डी.मुल्ला यांनी बोलतांना आजची तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली असल्याने त्यांच्या भविष्याची चिंता वाढली आहे, त्यांना बळकट बनवण्यासाठी ग्राम पंचायतीने घेतलेला हा उपक्रम फार मोलाचा आहे. यामुळे युवकांच्या आयुष्यात अनेक बदल होणार आहेत. असा हा उपक्रम राबविल्याबद्दल पंचायतीचे खूप खूप कौतुक करतो असे ते म्हणाले… यावेळी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावची पंचमंडळी, गावकरी व पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. पिडीओ सुनिल आंबारे यांनी आभार मानले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *