मंदिरे गावच्या ‘संस्काराची’ शिदोरी: आ. विठ्ठल हलगेकर…


आज हत्तरवाड येथे हनुमान मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा; मान्यवरांची उपस्थिती!

    

बिडी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       देवलोकांपासून लाभलेला धार्मिक वारसा सर्वांच्या एकोप्याचे प्रतीक ठरला असून, तीच परंपरा आजही आपण सर्वांनी सुरू ठेवली आहे. गावात मंदिरे असणे म्हणजे गावच्या एकोपा तसेच संस्काराची शिदोरी आहे, या गावच्या नागरिकांनी एकत्र येऊन बांधलेले हे मंदिर गावच्या एकोप्याचे प्रतीक मानावे लागेल, असे प्रतिपादन तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. हत्तरवाड (ता. खानापूर) येथील श्री हनुमान मंदिराचे उद्धघाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये ते बोलत होते. बाजूला माजी आमदार अरविंद पाटील व तालुक्यातील आजी माजी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

        

दिव्य मंदिराचे आमदारांच्याहस्ते उद्धघाटन…

          तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते भव्य आणि दिव्य नूतन हनुमान मंदिराचे उद्धघाटन व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आले. प्रारंभी आमदारांनी मंदिराचे दरवाजे उघडले आणि त्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करून दर्शन घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *