,

युवकांनो स्वतःच्या गावातच ‘स्वराज्य’ निर्माण करा ; अमित सौंदलगेकर…


डीआयजी एम. एल रवींद्र यांनी बोलतांना, पालकांनी मुलांवर दडपण आणू नये, त्यांना त्यांच्या आवडीचे काम करू द्यावे असा सल्ला दिला! ओलमणी शाहु हायस्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात ‘उत्तम मोटीवेशन’ ने युवक,राहू पालक मंत्रमुग्ध!

  

ओलमणी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      बैलूर, जांबोटी, ओलमणी, कणकुंबी हा परिसर निसर्ग समृध्दीबरोबर विविध उद्योगांसाठी मानला पाहिजेत. कारण, अज खेड्यातील युवक शहरांकडे आकर्षित होण्याचे प्रमाण अधिक असून, ते चित्रं भितीदायक वाटते. आपल्याच गावात विविध उद्योगांचे खुले मार्ग असतांना शहराकडे का? जावे बर. शहरी माणसांना खेड्यांकडे आणा असे सांगतानाच दुग्ध व्यवसाय, मध युवकांनो ‘स्व -गावी स्व- उद्योगी बना’ त्यासाठी आम्हाला कधीही आठवण करा,आम्हीं चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध राहू, असे आवाहन प्रभावी सामाजिक प्रवक्ते अमित सौंदलगेकर यांनी केले.  तसेच तोराळी येथील सीआरपीएफ केंद्राचे डीआयजी एम. एल.रवींद्र यांनी बोलतांना, पालकांनी मुलांवर दडपण आणू नये, त्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडू द्यावेत. ज्या युवकांना सैनिकात भरती व्हायचे आहे, त्यांनी पहिल्यांदा आमच्या कॅम्पशी संपर्क साधावा, जेणेकरून भरतीची उत्तम प्राथमिक माहिती मिळू शकेल आणि त्यानंतरच पुढचे पाऊल उचलावे की, नको हे समजून येईल, यासाठी कायम आमची मदत मिळेल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ओलमणी राजश्री शाहु हायस्कूलच्या स्नेह संमेलनावेळी दोन्हीं प्रवक्ते बोलत होते.

       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम होते. व्यासपिठावर एसडीएमसी अध्यक्ष तुकाराम हणमंत साबळे, पंचाय तपासनीस सुनील पाटील,जोतिबा जगताप, संजय बैलूरकर, निवृत पीएसआय दत्ता सुतार, शाहु साबळे, निवृत सुभेदार महिपत बेळगावकर, निवृत सुभेदार परशराम देसाई, एअरफोर्स निवृत अधिकारी प्रभाकर जगताप, निवृत टीएस नायक अरुण नेसरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सहशिक्षक अजित सावंत यांनी स्वागत केले.

मध व्यवसाय आणि गावठी गायींच्या संवर्धनाचे जगाचे लक्ष आपल्याकडे लागेल;; अमित सौंदलगेकर

  प्रभावी सामाजिक प्रवक्ते अमित सौंदलगेकर बोलतांना म्हणाले की, मित्रहो आपला हा भाग जगात भारी आहे, बैलूर क्रॉस जांबोटी ते ओलमणी जवळील आसपासच्या भागात जगात नंबर एकचे मध मिळते, त्याची लॅबमध्ये तपासणी केली असता, ते जगामध्ये सर्वात औषधी मध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा व्यवसाय आपल्यासाठी वरदानदायी ठरेल शिवाय जगाचे लक्ष आपल्याकडे लागेल, असे सांगतानाच आणखी एक महत्वाची बाब त्यांनी पटवून दिली ती म्हणजे गावठी गायींचे संवर्धन! पूर्वी लाखोंच्या संख्येने असलेल्या या गायींची संख्या आज हजारांच्या संख्येत येऊन ठेपली आहे. ती गाय म्हणजे आपली लक्ष्मी आहे, तीचे दूध औषधी असून, त्यातून अनेक आजारांवर मात करता येते. अशा बहूउपयोगी गायींची संख्या कमी झाली तर आपण मोठ्या नुकसानीत येऊ, हा धोका टाळण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन या वरदानदायी गायींच्या संवर्धनाची शपथ घेऊया. असे सांगतानाच  आपला गाव, आपली शेतकरी व्यवसाय जगात भारी असून, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तसाच तो राजाही आहे, त्यामुळे युवकांनी शहराकडे न जाता स्वतःच्या गावातच स्व उद्योगाची कास धरावी, भरपूर कष्ट केल्यानंतरच त्याचे फळ मिळू शकते,असेही श्री. सौंदलगेकर

गाव, शाळा, आई -वडिलांना विसरू नका; डीआयजी एम.एल रवींद्र ..

     आई वडील शाळा आणि शिक्षक यांच्यामुळे मोठे होत असता, त्यामुळे गाव शाळा आई वडिलांना कधीही विसरू नका, गावाशी कायमची नाळ जोडून ठेवावी असे आवाहन डीआयजी एम. एल. रवींद्र यांनी बोलतांना केले. गावात जे सुख आहे ते आणखी कोठेही नाही मिळणार असे सांगतानाच, वडिलांनीही मुलांवर दडपण आणू नये, त्यांच्या आवडीचे काम करू द्यावे असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. या आवाहनाला लोकांनीही भरभरून दाद दिली.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष तुकाराम हणमंत साबळे म्हणाले की, शाळा सुधारणा हाच आमचा ध्यास असून, गाव, शिक्षका आणि शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने शाळेचा विकास साध्य झाला आहे, त्याबद्द्ल मी सर्वांचा ऋणी आहे असे ते म्हणाले.

  यावेळी जांबोटी पंचायत बिल तपासनीस सुनील पाटील यांच्याहस्ते व्यासपीठ आणि कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी सचिन साबळे, सयाजी देसाई , डॉ. सुरज साबळे, किरण साबळे, विनोद डिचोलकर, कृष्ण भरणकर यांच्यासह पालक सर्व गावकरी सर्व सहशिक्षक उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सी. एस.कदम यांनी सांगितले की, माझ्या 34 वर्षाच्या कार्यकाळात येथील गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आम्हीं हे साध्य करू शकलो. दरवर्षी आम्हीं वेगवेगळ्या योजना राबवून आमचे हायस्कूल एका वेगळ्या क्षिजीजावर नेवून ठेवण्याचा आमचा मानस आहे, याला शाळा सुधारणा कमिटी पालक,सहशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, पुढे बोलतांना त्यांनी सर्वांचेच आभार मानले.

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *