शेतकऱ्यांनो गुरुवारपर्यंत शिल्लक ऊस उचला ; लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप) चे आवाहन!
गाळपाचे 30 लाखाचे उद्दिष्ट; 12 फेब्रुवारीला लैला शुगर्स चे गाळप संपणार; फडातील शिल्लक ऊस लवकरात लवकर आणण्याचे एमडी सदानंद पाटील यांची सूचना..…


खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदानदायी ठरलेल्या लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप) चे गाळप गुरुवारी (12 फेब्रुवारी) संपणार आहे, यंदा 30 लाख गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले असून, त्यानुसार वाटचाल सुरू आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारपर्यंत (दि.12) शेतात शिल्लक असलेला ऊस उचलण्याची सूचना कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी)सदानंद पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना केली आहे.
कारखान्याने ठरवून दिलेल्या वेळेत ऊसाची उचल न झाल्यास, त्यानंतर शिल्लक राहिलेल्या ऊसाला कारखाना जबाबदार राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असेही आवाहन एमडी सदानंद पाटील यांनी केले आहे. कारखान्याकडून तसे लेखी पत्र सादर करण्यात आले आहे..
