नंदगड:  संगोळी रायण्णा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित रहा: मा. आ.डॉ. अंजली निंबाळकर


मुख्यमंत्र्यांच्याहस्ते  उद्या उद्घाटन; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली पार पडेल कार्यक्रम…

    

नंदगड :  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

   

राज्याचा अभिमान वाढवणारा मोठा सोहळा सोमवार दि.19 रोजी नंदगड (ता. खानापूर) येथे होवू घातला आहे, येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा स्मृती स्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घघाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार असून. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर उपस्थित राहतील. हा कार्यक्रम रेवणसिद्धेश्वर मठाधीश श्री श्री डॉ.निरंजननादपुरी यांच्या सानिध्यात पार पडेल. यावेळी उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कन्नड व सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी , खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे, माजी आमदार, जिल्हाधिकारी महमद अहमदनगर, जिल्हापोलिस प्रमूख आर. रामराजन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, तालुका अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *