July 21, 2026

मद्य लायसन्ससाठी लांच घेतल्याप्रकरणी अबकारी खात्याचे उपायुक्त, डीसीसह कॉन्स्टेबलला लोकायुक्तकडून ‘अटक ‘

0
Screenshot_20260118_070308.jpg

CL7, मायक्रो ब्रेव्हरी लायसन्ससाठी 80 लाख घेण्याचा केला ठराव; उद्योगपती लक्ष्मी नारायण यांनी लोकायुक्त पोलिसांकडे केली होती तक्रार…

बंगळूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

       मद्य ( दारू विक्री) CL7,  मायक्रो ब्रेव्हरी परवान्यासाठी ( लायसन्स) 25 लाखाची लांच स्वीकारल्याप्रकरणी बंगळूर येथील अबकारी विभागाचे उपायुक्त, बैटरायनपुरा विभागाचे डीसी व त्यांचे कॉन्स्टेबल अशा तिघांना लोकायुक पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे अबकारी विभागात एकच खळबळ उडाली असून, याच विभागातील बेळगावसह राज्यातील असे भ्रष्ट अधिकारी लोकायक्तांच्या लिस्टवर असल्याचे वृत्त आहे..

CL7 आणि मायक्रो ब्रेव्हरी लायसन्सनची 80 लाखाची होती मागणी…

    बंगळूर येथील लक्ष्मी नारायण नामक उद्योगपतीने CL7 आणि मायक्रो ब्रेव्हरी लायसन्सनची मागणी अबकारी खात्याकडे केली होती. यासाठी नारायण यांनी सरकारी चलन फीही भरली असतांनाही अबकारी विभागाचे उपायुक्त जगदीश नायक, मैटापुरा येथील अबकारी अधीक्षक व त्यांचे कॉन्स्टेबल यांनी वरील दोन प्रकारच्या लायसन्स देण्यासाठी तब्बल 80 लाखाची मागणी केली होती. त्यापैकी 25 लाख घेताना लोकायुक्त पोलिसांनी या तिघांनाही पकडले. भ्रष्टाचार प्रबंधक कायदा 9 अन्वे या तिघांवरही गुंन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या घर, मालमत्तांची झाडाझडती घेण्यात येत आहे..

बेळगावमध्येही असे प्रकार जोरात; लोकयुक्तांचे लक्ष…

     अबकारी खात्यातील बेळगावसह राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांवर लोकायुक्त पोलिसांचे बारीक लक्ष असून, आणखी काही असे भ्रष्ट अधिकारी लोकायुक्त लिस्टवर असल्याचे वृत्त आहे.. बेळगावमध्येही असे प्रकार जोरात सुरू असल्याच्या तक्रारी आहेत…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *