Oplus_16908288
सुमेध ताळगावकर असे मृत युवकाचे नाव आहे..
बेळगांव: लोकहित न्यूज..
गोव्याच्या युवकाचा बेळगांव परिसरातील धबधब्यांवर बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सुमेध ताळगावकर असे मृत युवकाचे नाव असून, तो गोवा ( म्हापसा,) येथील राहणारा आहे. 35 घरात त्याचे वय असेल असा अंदाज बांधला जात आहे. बेळगांव परिसरातच ही घटना घडली असून, ती कशी आणि नेमकी कुठे घडली याची माहिती अद्याप समजू शकली नाही. लवकरच लोकहितच्या याबाबत माहिती समोर येईल, ती वाचकांपर्यंत पोहचवू…