बंगळूरचे अबकारी उपआयुक्त ‘नायक’  लोकायुक्त जाळ्यात; 80 लाखाची बेहिशेबी रक्कम जप्त…


गेल्या महिन्यापासून कृषी, बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांची लोकायुक्तकडून झाडाझडती सुरूच…

     

बंगळूर लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

      कर्नाटकातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, राजधानी बंगळूर येथील अबकारी खात्याचे उपआयुक्त (डीसी) जगदीश नायक यांच्यावर लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकून 80 लाखाची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे . आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाली. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या महिन्यापासून वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांची लोकायुक्त पोलिसांकडून झाडाझडती घेण्याचे सत्र सुरूच आहे.

याआधी बांधकाम, कृषी विभागातील अधिकाऱ्यांवर धाड टाकण्यात आली होती….

    याआधी सार्वजनिक बांधकाम आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांवर लोकायुक्त पोलिसांनी धाड टाकून कोटींची माया हस्तगत केली आहे. त्यानंतर आजची ही बंगळूरमधील बंगळूरमधील मोठी कारवाई मानली जात आहे. अद्याप पोलिसांचा तपास सुरूच असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यावरून राज्यात भ्रष्टाचाराचा आलेख अधिकच वाढत चालला असल्याचे स्पष्ट होत आहे, अद्याप याबाबत तपास सुरू असून, उद्या अधिक माहिती समोर येईल असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *