July 21, 2026

फक्त निवडणूक हक्क बजावण्यासाठी तेवढेच नव्हे तर,  नागरिकत्व टिकवण्यासाठी एसआयआर नोंदणी गरजेची: माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर..

0
IMG-20260716-WA0099

खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     मतदानापुरते एसआयआर नोंदणी असे समजू नका, भविष्यात देशातील नागरिकत्व टिकवण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे, असे सांगतानाच, पंचहमी योजनेचा लाभ घेण्यासाठीही याचा उपयोग आहे, असे आवाहन खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर यांनी केले. नगरपंचायत हॉलमध्ये काँग्रेसतर्फे एसआयआर नोंदणी  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विधान परिषद सदस्य पारस जैन, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  
     पुढे बोलतांना डॉ. निंबाळकर म्हणाल्या की, कांग्रेस पक्ष अल्पसंख्यांकाचा म्हणून विरोधकांकडून हिणवले जात असले, सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा आपला पक्ष आहे, याची सर्व भारतीयांना ओळख आहे. त्यामुळे आगामी ग्राम पंचायत, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकीत आपला विजय निश्चित असून, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या मा.आ. डॉ. निंबाळकर….
-नागरिकत्व, निवडणुकीचा हक्क बजावणे, राज्य सरकारच्या पंचहमी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी एसआयआर (SIR) नोंदणी महत्वाची आहे.
-विरोधकांकडून काँग्रेस पक्ष अल्पसंख्याकांचा तेवढाच असल्याची खोटी बदनामी केली जात आहे, त्यात काहीच तथ्य नाही.
-गेल्या तीन वर्षात स्थानिक कंत्राटदारांना कामच मिळाले नाही.

वाळू वाहतूक बंद पडल्याने अनेकांवर अर्थिक संकट कोसळले आहे.

आगामी विधानसभा, लोकसभा, जिल्हा व तालुका पंचायत, तसेच ग्राम पंचायत निवडणुकीसाठी सज्ज राहा असेही माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यावेळी केले.
यावेळी महानतेश राऊत, सावित्री मादार, दीपा पाटील, वैष्णवी पाटील, दीपक कवठणकर (जांबोटी), गीता अंबलगट्टी, मधुकर कवळेकर, संजय गावडे (जांबोटी), तोहीब चंदनावर, इशाक पठाण, लक्ष्मण पाटील, गुडू टेकडी आदी मान्यवर व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *