खानापूर: वाताळ नागराजच्या आंदोलनाची वल्गना; चन्नम्मा सर्कलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त…
म. ए.समितीच्या विरोधात आंदोलन करण्याची दर्पोक्ती, नेहमीप्रमाणे पुसका बार ठरण्याची शक्यता..
बेळगांव : लोकहित न्यूज नेटवर्क
नेहमीच मराठी भाषा आणि भाषिकांचा तिरस्कार करणाऱ्या वाटाळ नागराजने म. ए.समितीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा छेडण्याची वल्गना करताच बेळगांव चन्नम्मा सर्कलमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाळेकुंद्री येथे बसमध्ये प्रवाशी महिला आणि बस वाहकामध्ये झालेल्या भाषिक वैयक्तीक वादाला सार्वजनिक रंग देत जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचन्याचा केविलवाणा नागराज यांचा प्रयत्न पुसका बार ठरण्याची शक्यता आहे.
मागच्या आठवड्यात कन्नड रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने बेळगावात येवून मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकली होती. त्यानंतर आता वाटाळ नागराज याने बेळगावात येवून शांतता बिघडवण्याची जणू योजनाच आखली आहे. स्थानीक मराठी आणि कन्नड भाषिक गुण्या गोविंदाने नांदत असताना अशा विघ्नसंतोषी व्यक्तींकडून विनाकारण वातावरण बिघवण्याचे काम आतापर्यंत चालत आले आहे. पण, चूक कोणाची आहे, आणि कोण विनाकारण भाषिक भांडवल करतेय याचा विचार जिल्हा प्रशासनाने करण्याची गरज आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना स्थानीक पातळीवर उगाचच वाद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा अशा लोकांचा प्रयत्न असतो.
Leave a Reply