वडगांव ( जांबोटी) वेशीत शहीद जवान धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात उभारली स्वागत कमान..
जांबोटी: लोकहित न्यूज
देशाचा जवान हा आपले कवच आहे, आपले सैनिक देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करतात म्हणून आपण मुक्त श्वास घेत आहोत. देशाच्या वाटचालीत त्यांचें योगदान मोलाचे आहे. ते आम्हीं विसरून चालणार नाही असे सांगताच वडगांवचे सुपुत्र धोंडीबा देसाई हे राज्यातील एकमेव शहीद जवान म्हणून इतिहासात गणले जातात. त्यांचे देशासाठी बलिदान मोठें आहे. तालुक्यातील युवकांनी देसाई यांचा आदर्श घेत देशसेवेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. वडगांव (जांबोटी) येथील धोंडीबा देसाई यांच्या स्मरणार्थ वेशीवर स्वागत कमान उभारण्याचा गावकऱ्यांचा संकल्प कौतुकास्पद असेही त्यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.
यावेळी यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, बाबुराव देसाई, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, समिती नेते आबासाहेब दळवी, भाजप नेते लक्ष्मण झांजरे, जयवंत देसाई, उत्तम दळवी, शंकर सडेकर, गावचे प्रतिष्ठित पंच बळवंत इंगळे , धनश्री सरदेसाई, प्रभाकर देसाई , राजू चिखलकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जांबोटी ग्रा. पं. उपाध्यक्ष सुनील देसाई, शिक्षक कुशकुमार देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
मान्यवरांच्या हस्ते पावती बुकाचे प्रकाशन..
आमदार विठ्ठल हकगेकर,आ. अरविंद पाटील, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, बाबुराव देसाई, लक्ष्मण झांजरे, आबासाहेब दळवी यांच्याहस्ते पावती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले…

Leave a Reply