कारगील युद्धात राज्यात एकमेव शहीद जवान; धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगांवात उद्या  उभारणार प्रवेश कमान…


वडगांव ( जांबोटी) गावकऱ्यांचा मानस; आजी -माजी आमदार मान्यवर उपस्थित राहणार..

जांबोटी: लोकहित न्यूज..

1999 साली कारगील युद्धात शहीद झालेले  कर्नाटकातील एकमेव जवान म्हणून ओळखले जाणारे वडगांव ( जांबोटी) येथील धोंडीबा देसाई यांच्या स्मरणात वडगावात सुसज्ज प्रवेशद्वार अर्थात स्वागत कमान उद्या रविवार दिनांक 13 रोजी उभारणार येणार आहे. अशी योजना गावकऱ्यांनी आखली असून सकाळीं 10 .वा प्रवेशद्वाराच्या कॉलमभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्त आ. विठ्ठल हलगेकर , माजी आ. अरविंद पाटील, माजी जि.पं.जयराम देसाई,जि. पं. सदस्य बाबुराव देसाई, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेत्या सोनाली सरनोबत, आबासाहेब दळवी, जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगांवकर, धनश्री सरदेसाई , प्रभाकर देसाई उपस्थित राहणार आहेत  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त भारतीय जवान बळवंत इंगळे यांनी राहतील. तसेच प्रमुख वक्ते म्हणून माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, ओलमनी शाहु हायस्कूलचे सहशिक्षक अजित सावंत यांनी उपस्थित राहणार आहेत. यावेळी धोंडीबा देसाई यांच्या आई -वडिलांचा वडगांव गावकऱ्यांच्याहस्ते विशेष गौरव करण्यात येणार आहे.. तसेच  रवींद्र कळेकर यांच्याच्याहस्ते पावती पुस्तकाचे प्रकाशन होईल. स्वागताध्यक्ष म्हणून जांबोटी पंचायतीचे उपाध्यक्ष सुनिल देसाई व शिक्षक कुशकुमार देसाई हे उपस्थित राहतील तर किणये सरस्वती हायस्कूलचे सहशिक्षक मुकुंद देसाई यांनी कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *