हिटमॅन रोहित शर्मा ठरला विजयाचा हिरो; गोलंदाज अश्विनीकुमार, यार्करकिंग बुमराहची चांगली चमक…. रविवारी मुंबईचा सामना पंजाबबरोबर रंगेल…
चंदीगड: लोकहित क्रीडा न्यूज
अठरा वर्षांच्या काळात पाच वेळा आयपीएल विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला 20 धावांनी पराभूत करत आयपीएलच्या 18 व्या सत्रात पुन्हा एकदा आपलीं विजयाची दावेदारी पक्की क्रत दुसऱ्या क्वालिफायमध्ये मजल मारली असून, या फेरीत मुंबईचा सामना रविवारी ( दिनांक 1 जून) रोजी पंजाब किंगशी अहमदाबाद येथे होणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्याने घेतला होता. अनुभवी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 2029 धावांचे लक्ष्य गुजरात समोर ठेवले होते. यामध्ये हिटमॅन रोहित शर्माने 80 धावा, जॉनी बेसस्टो 48 धावा काढून चांगली सुरवात करुन दिली. तर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनीही चांगली चमक दाखवून दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्णधार शूभमन गिल वगळता साई सूदरर्शन याने एकेरी झुंज देत 80 धावांचे योगदान दिले, त्याला वॉशिंग्टन सुंदर(48 धावा) , शरफान रुथरफोर्ड 24 , कुशल मेंडिस, राहूल तेवतिया यांचीशी साथ लाभली. मात्र, मुंबईच्या गोलंदाजीसमोर त्यांचा काही निभाव लागू शकला नाही. अखेर 20 धावांनी गुजरातला पराभव पत्करावा लागला. मुंबईतर्फे ट्रेंट बोल्ट 2, जसप्रीत बुमराह, अश्विनी कुमार, रिचर्ड ग्लेसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. यामध्ये रिचर्ड ग्लेसंनने साई सुदर्शनचा विकेट घेत गुजरातचा विजयरथ रोखला. या विजयाने मुंबईचा संघ क्वालिफाय – 2 मध्ये पोहचला असून, रवीवारी -1 जूनला अहमदाबाद येथे त्यांचा पंजाब किंग याच्या बरोबर क्वालिफाय- 2 सामना रंगेल. यातून विजयी झालेला संघ याच मैदानावर मंगळवारी 3 जून रोजी बंगळूरबरोबर शेवटचा सामना खेळेल.

Leave a Reply