July 21, 2026

तालुक्यांत तीन शाळांच्या दुरुस्तीसाठी 9 लाखाचा निधी मंजूर

0
image_editor_output_image-1505829459-17426422443682492981895874654280.jpg

आमदार विठ्ठल हलगेकर यांची लोकहित न्यूजला माहिती

खानापूर: लोकहित न्यूज 

  जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांसाठी निधी मंजूर झाला असून, तसे पत्र आमदार विठ्ठल हलगेकर यांना सबंधित खात्याचे पाठवले आहे. तशी माहिती आ. विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज’ ला दिली.

    खानापूरातील तीन शाळांसाठी 9 लाखाचे निधी मंजूर झाला असून, त्यामध्ये कालमणी मराठी शाळेला 3 लाख, कणकुंबी प्राथ. मराठी शाळेसाठी 3 लाख तर गोदगेरी प्राथ. मराठी शाळेला 3 लाख मंजूर झाले आहेत. त्यामधून शाळेचा विकास करण्यात येणार असल्याचेही आ. हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलताना सांगितले. हा निधी जिल्हा खनिज खात्यातून मंजूर जिल्हाधीकारी कार्यालयातून आ. विठ्ठल हलगेकर व तालुका बांधकाम खात्याला याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *