रेशन वाटप तालुका कमीटी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांची माहिती, रेशन दुकानदार संघटना अध्यक्षावर होणार कारवाई..
खानापूर: लोकहित न्यूज
तालुक्यांत सरकारची रेशन वाटप योजना गोरगरीब जनतेसाठी आधार ठरलेली असताना तालुका अन्न पुरवठा खाते व मार्केटींगकडूनच कमी धान्य पुरवठा केला असल्याने नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन कमी मिळत आहे. आम्हीं गेला महिना याची पाहणी करून छाननी केली असता, काहीं रेशन दुकानदारांकडून रेशन मारले जाते तर चक्क तालुका अन्न पुरवठा खाते व मार्केटिंग सोसायटीकडूनच तब्बल दीड दीड क्विंटल कमी रेशन पुरवठा केला जातो. हा इतका तांदुळ जातो कुठे? याची चौकशी लावली जाईल, तसेच कमी पडलेला तांदुळ वसूल केल्याशिवाय तालुका ब्लॉक काँग्रेस व रेशन वाटप कमिटी गप्प बसणार नसल्याचा इशारा तालुका रेशन वाटप कमिटी अध्यक्ष सुर्यकांत कुलकर्णी यांनी खानापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आमच्या माहितीनुसार जिल्हा अन्नपुरवठा नाईक व तालुका अन्न पुरवठा अधिकारी नदाफ यांच्या दबावामुळे रेशन पुरवठ्यात गोंधळ होत असल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे. त्याविरोधात अन्न पुरवठामंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आय.आर.घाडी यांनी यावेळी दिली. पुढे बोलतांना घाडी म्हणाले की, माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यांत कोणत्याही खात्यात गोंधळ, गैरव्यवहार झाल्यास तालुका ब्लॉक काँग्रेसने त्याचा पाठपुरावा करून कारवाईसाठी प्रयत्न केला आहे. धान्य पुरवठा सुरळीत होत आहे, म्हणून मार्केटींगमध्ये बैठक बोलावून सह्या घेतल्या जात आहेत. त्यातीलही काहीं दुकानदारांनी आमच्याशी संपर्क साधून सह्या घेतल्या जात असल्याची माहिती सुर्यकांत कुलकर्णी यांनी दिली.
प्रसारमाध्यम आणि आमच्या जागृतीमुळे 80 टक्के सुरळीत पुरवठा- कुलकर्णी
गेल्या महीन्यात नागरिकांना पंधरा किलो तांदूळ वाटप सुरळीत करण्यासाठी आम्हीं तालुक्यातील बहुतेक रेशन दुकानांना भेटी देवून जागृती केली होती. तालुक्यांतील प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी उत्तम प्रकारे प्रसिद्धी दिल्याने तालुक्यात 80 टक्के सुरळीत रेशन पुरवठा झाला असल्याची माहिती सुर्यकांत कुलकर्णी यांनी दिली. रेशन पुरवठ्यात गोंधळ करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा कुलकर्णी यांनी पुढे बोलतांना दिला. यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेसचे नेते महातेश, गुड्डू टेकडी, इशाक पठाण, रेशन कमिटी सदस्य उपस्थित होते.
Leave a Reply