दोन -तीन वेळा वळीवाची हजेरी तरीही गर्मीचा वाढता पारा..
जांबोटी:: लोकहित न्यूज
गेला दिड महिना सूर्य जणू आग ओकत आहे, त्यामुळे नागरिकांसह प्राणी पक्षीही हैराण झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे नदी -नाले विहिरी कोरड्या पडू लागल्या असून काहीं गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या काळात दोन -तीन वेळा वळीव पावसाने हजेरी लावली पण त्याचे प्रमाण कमी असल्याने उष्म्यांध्ये अधिकच भर पडत असलेलेही पाणी कमी पडू लागले आहे. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास जांबोटी आणि परीसरात आकाशात ढगांनी दाटी केली होती, त्यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस पडणार असे चित्र होते. मात्र, अशा वातावरणामुळे शेतकरी मात्र, द्विधा मनस्थितीत सापडला आहे, पाऊस पडला तरी चांगलेच नाहीं पडला तरी सद्या तरी काहीं फरक पडणार नाही अशी अवस्था झाली आहे .
सुगी हंगाम कामांना सुरुवात..
एप्रिल संपत आला असून मे – जूनमध्ये शेती सुगी हंगाम सुरू होणार आहे. त्या तयारीत शेतकरी दिसत आहेत. मात्र, शेती मशागतीसाठी मोठया पावसाची गरज आहे. पण, सद्या माळराणावर रचून ठेवलेले वाळके गवत पावसाआधी आडोश्याला अर्थात घरी भरायचे आहे. त्यामुळे या कामासाठी पाऊस थोडा लांबला तरी चालेल अशीही भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

Leave a Reply