पुणे येथील 31 व्या नवोदित साहित्य संमेलनात 9 मे ला आखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने या पुरस्काराचे होणार वितरण..
पुणे: लोकहित न्यूज
पुणे येथील अखिल भारतीय साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार कालमणी ( ता.खानापूर) येथील सुपुत्र, उत्तम सूत्रसंचालक, महत्वाच्या विविध पदांवर असणाऱ्या तसेच कणकुंबी माऊली विद्यालयाचे उत्कृष्ठ मुख्याध्यापक सुनिल चीगुळकर यांना जाहीर झाला असून, तसे पत्र पुणे आखिल भारतीय साहित्य परिषदेने चीगुळकर पाठवले आहे. 9 मे रोजी साहित्य संमेलनाच्या उद्घाघाटनप्रंसगी हा पुरस्कार बहाल केला जाईल.
शिक्षणाबरोबर सातत्याने समाजसेवेत कार्यरत असणे, समाजाच्या हितासाठी झटत रंजल्या गांजलेल्याच्या समस्या सोडवण्यास पुढाकार घेणे, या कार्यात असणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुळात मुख्याध्यापक असणारे सुनिल चीगुळकर यांनी सामाजिक कार्यातही मुख्यस्त असल्याचे पुणे आखिल भारतीय साहित्य परिषदेच्या निदर्शनास आल्याने त्यांनी यंदाचा महात्मा फुले शिक्षकरत्न पुरस्कार चीगुळकर यांना जाहीर करण्याच्या निर्णय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद मोरे – उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर व सर्व सदस्यांनी घेतला. याबद्दल चीगुळकर यांचे तालुक्याचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. … लोकहित न्यूज’ तर्फे सुनील चीगुळकर यांना मानाचा मुजरा…

Leave a Reply